शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

जिल्ह्यात दिग्गज नेत्यांचा प्रचारासाठी राबता

By admin | Published: October 08, 2014 10:29 PM

तोफा धडाडणार : प्रत्येक मतदारसंघात रणधुमाळी

सातारा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात केंद्रीय मंत्री तसेच राज्य पातळीवरील नेत्यांच्या तोफा धडाडणार आहेत. भाजपचे तीन केंद्रीय मंत्री विविध मतदारसंघांत सभा घेणार आहेत. राष्ट्रवादीच्या दोन सभा होणार आहेत. प्रचाराची सांगता सभा राष्ट्रवादीने साताऱ्यात घेणार असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसचे नेतेही ‘कऱ्हाड दक्षिण’मध्ये मुख्यमंत्र्यांच्या प्रचारार्थ तळ ठोकून आहेत. विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. प्रत्येक पक्षाच्या राष्ट्रीय आणि राज्यपातळीवरील नेत्यांच्या तोफा प्रचारसभांमधून धडाडू लागल्या आहेत. ‘सातारा-जावळी’चे भाजपचे उमेदवार दीपक पवार यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची गुरुवारी, दि. ९ रोजी दुपारी तीन वाजता गांधी मैदानावर होणार आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘कऱ्हाड उत्तर’चे उमेदवार बाळासाहेब पाटील यांच्या प्रचारार्थ गुरुवारी, दि. ९ रोजी दुपारी बारा वाजता उंब्रज येथे आर. आर. पाटील यांची सभा होणार आहेत.‘सातारा-जावळी’चे उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारार्थ शुक्रवार, दि. १० रोजी सकाळी अकरा वाजता कुडाळ येथे अजित पवार यांची सभा होणार आहे. ‘कऱ्हाड उत्तर’मधील ‘स्वाभिमानी’चे उमेदवार मनोज घोरपडे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची रविवार, दि. १२ रोजी सभा होणार आहे.पाटणचे भाजपचे उमेदवार दीपक महाडिक यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री उमा भारती यांची दि. ११ अथवा १२ रोजी पाटण येथे सभा होणार आहेत. याची घोषणा दोन दिवसांतच होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)मोदींची सोमवारी सभापंतप्रधान नरेंद्री मोदी यांनी ‘कऱ्हाड दक्षिण’चे भाजपचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांच्या प्रचारार्थ सोमवार, दि. १३ रोजी तारीख दिली आहे. कऱ्हाड येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर ही सभा होणार आहेत. दरम्यान, मोदी यांच्या प्रचारसभेचा कार्यक्रम भाजप जिल्हा कार्यकारिणीकडे आला असल्याची माहिती देण्यात आली.