शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
3
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
4
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
5
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
6
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
7
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
8
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
9
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
10
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
11
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
12
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
13
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
14
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
15
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
16
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
17
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
18
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न

जि.प.पदाधिकारी निवडी २१ ला

By admin | Published: March 06, 2017 11:43 PM

कार्यक्रम जाहीर : अध्यक्षपदासाठी संजीवराजे नाईक-निंबाळकर यांचे नाव आघाडीवर

सातारा : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सोमवारी जाहीर केला. जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात २१ मार्चला दुपारी अडीच वाजता या निवडी जाहीर केल्या जाणार आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाष नरळे व उपाध्यक्ष रवी साळुंखे यांची मुदत २० मार्चला संपत असल्याने नूतन पदाधिकाऱ्यांची निवड दि. २१ मार्चला करणे क्रमप्राप्त आहे. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी पदाधिकारी निवडीच्या कार्यक्रमावर शिक्कामोर्तब केले. दि. २१ मार्चला सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) रवी शिवदास यांच्याकडे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल करायचा आहे. दुपारी २ ते २.१० या वेळेत कोरम तपासणी होईल. कागदपत्रांची तपासणी करून दुपारी २.२१ ते २.३० या वेळेत अर्ज माघारी घेता येतील. दुपारी २ वाजून ३१ मिनिटांनंतर आवश्यक वाटल्यास अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांसाठी मतदान घेण्यात येईल. अध्यक्षपदासाठी जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीचे सभागृह नेते संजीवराजे नाईक-निंबाळकर यांचे नाव आघाडीवर आहे. या शर्यतीत वसंतराव मानकुमरे, मनोज पवार, सुरेंद्र गुदगे, मानसिंगराव जगदाळे यांचीही नावे चर्चेत आहेत. पक्षाच्या निर्णयाकडे या सर्वांसह त्यांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, जिल्ह्यातील ११ पंचायत समितींच्या सभापती व उपसभापती निवडी दि. १४ मार्चला संबंधित तालुक्यांच्या ठिकाणी होणार आहेत. सभापती व उपसभापती निवडीसाठीही अनेकांनी फिल्डिंग लावली आहे. (प्रतिनिधी)