सातारा : जिल्हा माहिती कार्यालयात येणाऱ्या अधिकारी, पत्रकार अन्य अभ्यागतांना वाळा घातलेल्या तांब्याच्या भांड्यातील पाणी, शेंगा आणि सेंद्रिय गुळाचा खडा व शेंगा खास पाहुणचार म्हणून दिला जातो. जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनीही या खास पाहुणचाराची गोडी चाखली.घरी येणाऱ्या पाहुण्याला गूळ, शेंगा आणि रांजणातील थंडगार तांब्याभर पाणी देणं हा खास मराठमोळा पाहुणचार एकीकडे लोप पावत चालला असताना जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी मात्र हा खास पाहुणचार जोपासला आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी जिल्हा माहिती कार्यालयाला भेट देऊन कार्यालयाने सुरू केलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमाची पाहणी केली. कार्यालयाने सुरू केलेल्या नवीन संकेतस्थळाविषयी तसेच ‘महादूत’ या मोबाईल अॅपविषयी माहिती घेऊन समाधान व्यक्त केले. हा पाहुणचार उत्साहवर्धक, लोहवर्धक तर आहेच. त्याशिवाय गोडवा राखणारा आणि वाढविणारा आहे, अशा शब्दात त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. (प्रतिनिधी)
जिल्ह्याधिकाऱ्यांनी चाखली गूळ, शेंगदाण्याची गोडी
By admin | Published: May 04, 2016 10:39 PM