दत्ता यादव ।सातारा : आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारच्या वनस्पती असतात. मात्र, त्या वनस्पतीचे ज्ञान नसल्यामुळे त्याची किंमत आपल्याला समजत नाही. परिणामी अशा वनसंपदेला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा भाव असतो. हे ओळखून शासनाने ग्रामीण भागात वनसंपदा शोधण्यासाठी समिती गठीत केली आहे.
या समितीच्या माध्यमातून परिसरातील वनसंपदा शोधली जाणार आहे. एवढेच नव्हे तर या वनसंपदेला चांगली बाजारपेठ मिळवून देण्यात येणार असून, त्यामुळे गावकरी आता श्रीमंत झालेले पाहायला मिळणार आहेत.अनेक व्यापारी गावकऱ्यांकडून वनसंपदा खरेदी करत जातात. त्या शेतकºयाला अथवा जमीन मालकाला त्यांच्याकडून कवडीमोल दर मिळत असतो. त्याच्या दृष्टीने त्याच्याजवळ असलेली वनसंपदा बिनकामी आणि निरोपयोगी वाटत असते. त्यामुळे मिळेल त्या दराने वनसंपदा तो व्यापाºयांच्या पदरात टाकत असतो.
गावोगावी जाऊन वनसंपदा शोधल्यानंतर त्याचे संकलन केले जाणार आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांच्या बिया, पाने यावर प्रक्रिया करून त्याच्यापासून विविध प्रकारची औषधे तयार केली जातात. त्यामुळे वनसंपदेला आता अत्यंत महत्त्व आले आहे. ग्रामीण भागामध्ये करंजीच्या बीया मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असतात. केवळ पाच ते सात रुपये किलोने या बिया दुकानदारांना विकल्या जातात; परंतु आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये याच बियांना पाच हजारांच्या घरात दर मिळत असतो. त्यामुळे या वनसंपदेतून गावचा विकास आणि मालकाचीही भरभराटी झाली पाहिजे, हा हेतू ठेवून शासनाने जैवविविधतेचे रक्षण आमचे आम्हीच करू, असा नारा देत गावकºयांना श्रीमंत करण्याचा निर्धार केला आहे.नोंदी गोपनीय असणार..ज्या शेतकºयांच्या किंवा जमीन मालकाच्या बांधावर वनसंपदा सापडणार आहे. त्याला चांगला मोबदला मिळाला पाहिजे. यासाठी शासनस्तरावरून आता प्रयत्न सुरू झाले असून, गावच्या परिसरात असलेली वनसंपदा शोधण्यासाठी ग्रामपंचायत पातळीवर समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये कमीत कमी सात तज्ज्ञ लोक असणार आहेत. या समितीच्या माध्यमातून आपापल्या भागामध्ये फिरून वनसंपदा शोधल्या जाणार आहेत. कोणत्या प्रकारच्या जैवविविधता आहेत, याच्या नोंदी घेतल्या जाणार आहेत; परंतु या नोंदी गुप्त ठेवण्यात येणार आहेत. जेणेकरून वनसंपदा सापडल्यानंतर त्याचा अन्य लोकांकडून गैरफायदा होऊ नये, याची खबरदारी घेतली जाणार आहे.
ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात वनपंदा आहे. या वनसंपदेच्या माध्यमातून गावकºयांनाही याचा मोठा मोबदलला मिळणार आहे. शासनाने नुकतीच यासंदर्भात कार्यशाळा घेतली आहे. याची विस्तृत माहितीही दिली आहे. तज्ज्ञ समितीच्या माध्यमातून गावची वनसंपदा सुरक्षित राहाण्यासाठी प्रयत्न होणार आहेत.-संजय जाधव (ग्रामविकास अधिकारी)