शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

जिल्ह्यात वाढला यंदा साखरेचा गोडवा

By admin | Published: May 24, 2015 10:59 PM

१२ लाख क्विंटल अधिक उत्पादन : गेल्यावर्षीपेक्षा निम्मे कारखाने अद्याप सुरूच

वाठार स्टेशन : चालू हंगामात साखर कारखानदार व शासनाकडून शेतकऱ्यांच्या पदरी ऊसदराबाबत घोर निराशा झाली. ‘एफआरपी’प्रमाणे दर देताना काही कारखाने सोडता इतर कारखान्यांनी शासनाच्या मदतीवर शेतकऱ्यांना एफआरपीचा ठेंगा दाखवण्याचेच काम केले. यामुळे आता एफआरपीचा चेंडू शासन दरबारी टाकत कारखानदारांनी ऊसदराबाबतची जबाबदारी झटकली आहे. तर दुसरीकडे मात्र या हंगामात जिल्ह्यातील अनेक कारखान्यांनी आपल्या आजवरच्या गाळपाचा विक्रम मोडला आहे. न्यू फलटण शुगर वर्क्स साखरवाडी या कारखान्याने सात महिन्यांत पहिल्यांदाच ५ लाख ६३ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेत कारखान्यातील आजपर्यंतच्या गाळपाचा उच्चांक मोडला आहे. गतवर्षी १५ मे अखेर जिल्ह्यातील एकूण ११ कारखान्यांपैकी जवळपास दहा कारखान्यांनी गाळप हंगाम संपवला होता. चालू वर्षी १२ कारखान्यांपैकी अजूनही ६ कारखाने सुरू असून, ३१ मे पर्यंत गाळप हंगाम सुरू राहील, अशी परिस्थिती आहे.सन २०१४ च्या गाळप हंगामाची परिस्थिती पाहता जिल्ह्यात ऊसदरासाठी शेतकरी संघटनांनी मोठे आंदोलन केले. या आंदोलनाचा केंद्रबिंदू कऱ्हाडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या भूमीत असतानाही शेतकरी संघटनांच्या आंदोलनाकडे शासन व साखर कारखानदारांनी डोळेझाक करीत शेतकऱ्यांना २००० ते २५०० रुपये उसाचा दर देण्याची भूमिका घेतली.यानंतर लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकांचे वारे २०१५ च्या गाळप हंगामापूर्वीच वाहू लागले. या निवडणुकीपूर्र्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊसपरिषद झाली; मात्र यावेळी आंदोलनाची दिशा स्पष्ट न झाल्याने केवळ ३००० ते ३२०० एकरकमी ऊसदर मिळावा, ही भूमिका मांडण्यात आली. दरम्यान, कारखाने कोणत्याही दराच्या घोषणेशिवाय सुरळीत सुरू झाले तरीही या कारखान्यांवर कुणाचाच वचक राहिला नाही. दरम्यान, देशातील व राज्यातील नवीन सरकार शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मिळवून देईल याच भोळ्या आशेवर ऊस उत्पादक शेतकरी राहिला. आणि पहिल्यांदाच एफआरपीचे सूत्र ऊसदरासाठी कारखान्यावर शासनाकडून लादण्यात आले. गतवर्षीच्या सरासरी साखर उताऱ्यानुसार प्रत्येकाची एफआरपी जाहीर झाली. यामध्ये किसन वीर, प्रतापगड, अजिंक्यतारा या कारखान्यांनी ती मान्य केली; मात्र इतरांनी सध्याच्या साखर दराची परिस्थिती दाखवत एफआरपी पोटी हप्ते देण्याचे काम केले. (वार्ताहर)दोन लाख मे. टन ऊस तोडणीसाठी शिल्लकंदोन्ही हंगामांतील गाळपाची आकडेवारी पाहता आजअखेर जवळपास १२ लाख क्विंटल साखर गेल्या हंगामापेक्षा वाढली आहे. अजून जवळपास सहा कारखान्यांकडे २ लाख मे. टन उसाचे क्षेत्र शिल्लक आहे. यामुळे ३१ मे अखेर हे शिल्लक क्षेत्र संपवण्यासाठी कारखान्यांची मोठी तारांबळ उडाली आहे. यातच मान्सूनपूर्व वादळी पावसामुळे तोडणी हंगाम लांबणीवर पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पाऊस वेळेत न थांबल्यास काही प्रमाणात जिल्ह्यात उसाचे क्षेत्र तोडणीअभावी शिल्लक राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.१५ मे अखेर साखरनिर्मितीची तुलनात्मक आकडेवारीकारखाना २०१४ साखर उत्पादन २०१५ साखर उत्पादन(लाख क्विंटल) (लाख क्विंटल)श्रीराम ४१७७३५ ४२८८५० गाळप बंदकृष्णा १३२९३५० १३८१२५० गाळप बंदकिसन वीर ९२९२५० ९५२१६०*देसाई ३३७४३२ ३५०५७५*सह्याद्री १५४२३७० १५५३७००*अजिंक्यतारा ७५२६१० ७९५०४०*रयत २३१७८० १९५९२० गाळप बंदप्रतापगड ४५८१५० ४८०७००*न्यू फलटण ३२२१८० ५६३५५० गाळप बंदजरंडेश्वर ५६६५०० ६१४०३० गाळप बंदजयवंत ४६१६०० ५१७२२०गाळप बंदग्रीन पॉवर ६९२६०० गाळप बंदएकूण ७३४८९५७ ८५२५५९५ (१५मे अखेर)