सातारा : जिल्हा परिषदेतील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी पदभार सोडला असून, ते रत्नागिरीला प्रतिनियुक्तीवर गेले आहेत. त्यांच्या जागी आता अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील यांची तात्पुरती नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेतील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आठल्ये यांनी दोन वर्षांपूर्वी पदभार घेतला होता. आठ दिवसांपूर्वी त्यांची रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रतिनियुक्ती करण्यात आली. पण, त्यांच्या जागी कोणाचीच नियुक्ती झाली नव्हती. त्यामुळे त्यांना सोडण्यात आले नव्हते. मंगळवारी डॉ. आठल्ये यांना प्रतिनियुक्तीवर मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी सोडले. त्यामुळे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील यांच्याकडे जिल्हा आरोग्य अधिकारी पदाचा तात्पुरता पदभार देण्यात आला आहे. यापूर्वीही पाटील यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून अतिरिक्त पदभार सांभाळला होता.
चौकट :
पाटील यांच्याकडे तीन पदांचा भार...
डॉ. सचिन पाटील यांच्याकडे जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य म्हणून पदभार आहे. पण, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी पद रिक्त असल्याने त्यांच्याकडे या पदाचाही ‘अतिरिक्त’ भार आहे. त्यातच आता जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची बदली झाल्याने पुन्हा हा तिसरा पदभार आला आहे.
......................................................