शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

जि. प. अध्यक्षाचा आज फैसला

By admin | Published: July 11, 2016 1:06 AM

चौघांच्या नावाची चर्चा : राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक; उत्सुकता शिगेला

 सातारा : जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीबाबत रविवारी इच्छुकांची व सदस्यांची भूमिका राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जाणून घेतली. बैठकीत सुभाष नरळे, आनंदराव शेळके-पाटील, जयश्री बोडके, मानसिंगराव माळवे यांच्या नावाची चर्चा झाली. दरम्यान, आज, सोमवारी सकाळी दहा वाजता पक्षाच्या बैठकीत अध्यक्षपदाचा फैसला करण्यात येणार आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव पाटील यांच्या उपस्थितीत रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात बैठक झाली. बैठकीला उपाध्यक्ष रवी साळुंखे यांच्यासह सभापती आणि सदस्य उपस्थित होते; मात्र पाच सदस्यांनी दांडी मारली. अध्यक्षपदासाठी इच्छुकांची संख्या वाढली आहे. पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. अध्यक्षपद पाटणला द्यावे, अशी आग्रही मागणी या बैठकीत माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी केल्याचे समजते. आमदार प्रभाकर घार्गे यांनीही खटाव तालुक्याच पद मिळाले पाहिजे, असा आग्रह धरल्याने रविवारच्या बैठकीत अध्यक्षपदाच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकले नाही. अध्यक्षपदासाठी सर्वच तालुक्यातील सदस्यांनी पक्षाकडे दावा केल्यामुळे आजच्या बैठाकीत रामराजे आणि ज्येष्ठ नेते माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांना निर्णय घेता आला नाही. बैठाकीत सर्व सदस्यांची मते जाणून घेतल्यानंतर अध्यक्षपदाचे नाव सोमवारी जिल्हा परिषद अध्यक्ष निवासस्थानी होणाऱ्या बैठाकीत जाहीर करू, असे रामराजेंनी सांगितले. सर्व इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून अध्यक्षपदावर दावा केल्याने राष्ट्रवादीसमोर कुणाच्या नावाची घोषणा करायची, असा मोठा पेच निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी) हे आहेत इच्छुक... इच्छुकांची संख्या जास्त असली तरी माण गटातील सुभाष नरळे, लोणंद गटातील आनंदराव शेळके-पाटील, पाटण जयश्री बोडके, मानसिंगराव माळवे आदींची नावे आघाडीवर आहेत. या चारपैकी एकाचे नाव अध्यक्षपदासाठी निश्चीत होणार असल्याचे बोलले जात आहे.