शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

सरत्या वर्षाला निरोप देताना ‘दारू नको दूध प्या’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 11:53 PM

सातारा : सरत्या वर्षाला निरोप देत आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुणाईपासून अबालवृद्धांपर्यंत सर्वच उत्साहात असतात. अनेकजण दारूच्या नशेत बेधुंद होऊन डीजेच्या तालावर नाचून थर्टीफस्ट साजरे करतात. अंनिसच्या वतीने दरवर्षीप्रमाणे रविवारी राजवाडा परिसरात ‘चला व्यसनाला बदनाम करू या’ या मोहिमेद्वारे दुधाचे वाटप करून ‘दारू नको दूध प्या,’ असा संदेश दिला.सरत्या वर्षाचे ...

सातारा : सरत्या वर्षाला निरोप देत आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुणाईपासून अबालवृद्धांपर्यंत सर्वच उत्साहात असतात. अनेकजण दारूच्या नशेत बेधुंद होऊन डीजेच्या तालावर नाचून थर्टीफस्ट साजरे करतात. अंनिसच्या वतीने दरवर्षीप्रमाणे रविवारी राजवाडा परिसरात ‘चला व्यसनाला बदनाम करू या’ या मोहिमेद्वारे दुधाचे वाटप करून ‘दारू नको दूध प्या,’ असा संदेश दिला.सरत्या वर्षाचे आभार मानून कडू-गोड आठवणींचा संचय घेऊन आगामी वर्षात पदार्पण करताना अनेकजण दारूचा पहिला अनुभव घेतात. दारूच्या नशेत बेधुंद होऊन व्यसनाधीनतेकडे वाटचाल करतात. त्यामुळे अनेकांचे जीवन उद्धवस्त होते. तरुणाईला या व्यसनाधीनतेतून बाहेर काढण्यासाठी डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी गेली अनेक वर्षे ‘चला व्यसनाला बदनाम करू या’ ही मोहीम सुरू केली. या मोहिमेद्वारे अंधश्रद्धा निर्मूलन समिती व परिवर्तन व्यसनमुक्ती संस्था यांच्या वतीने ‘दारू नको दूध प्या’ हा उपक्रम सातारा शहरात राबवला जातो. यावेळी लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयातील विवेकवाहिनीच्या कार्यकर्त्यांनी व्यसनमुक्ती या विषयावर पथनाट्य सादर केले. उपक्रमादरम्यान, ‘द दारूचा नव्हे, द दुधाचा,’ ‘नो चिअर नो बिअर, ओन्ली हॅप्पी न्यू ईयर,’ ‘हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर, खाणार नाही गुटखा पिणार नाही बिअर,’ या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. नवीन संकल्प व नवी ऊर्जा घेऊन आप्तेष्टांबरोबर खाण्याबरोबर, संगीत व खेळांच्या कार्यक्रमांचा आस्वाद घेऊन नवीन वर्षांचे स्वागत करा, असा संदेश देण्यात आला. यावेळी डॉ. शैला दाभोलकर, डॉ. हमीद दाभोलकर, कुमार मंडपे, उदय चव्हाण, वंदना माने, भगवान राणदिवे, अजय ढाणे, डॉ. दीपक माने, प्रशांत पोतदार व कार्यकर्ते उपस्थित होते.