औंध : ‘मागील दहा वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकास करणे थोडे अवघड होते; मात्र आता ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावचा परिपूर्ण विकास शक्य आहे. पदाधिकारी, ग्रामसेवक व ग्रामस्थांनी हातात हात घालून एकजुटीने सर्वांगीण विकास करावा,’ असे मत गटविकास अधिकारी रमेश काळे यांनी गुरुवारी व्यक्त केले.
गोपूज येथे घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन व अन्य कामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सरपंच सरिता घार्गे, उपसरपंच अँड. संतोष कमाने, सदस्या उमाताई घार्गे, नीलम घार्गे, मनीषा जाधव, ग्रामसेवक सुनील राजगुरू, अनिल वसव, जयंत घार्गे, संभाजी घार्गे, सत्यवान कमाने, चंद्रकांत घार्गे, सुनील खराडे, बाळासाहेब चव्हाण, पृथ्वीराज घार्गे, दस्तगीर मुल्ला, सचिन घार्गे, बाबू मुल्ला, कृष्णात जाधव, माणिक घार्गे, सुरेश घार्गे, रामदास घार्गे, सोमनाथ घार्गे, गणपत मदने उपस्थित होते.
काळे म्हणाले, नूतन पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांनी टाकलेल्या विश्वासाला शोभेल असे काम करावे. समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन न्याय देण्याचे काम करीत राहावे. आपले गाव आदर्श व सुंदर बनविण्यासाठी प्रयत्नशील राहावे. उपसरपंच संतोष कमाने यांनी सूत्रसंचालन केले.
(वा.प्र.)
फोटो : १८गोपूज - रमेश काळे
गोपूज येथे गटविकास अधिकारी रमेश काळे यांच्या हस्ते विविध कामांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सरपंच सरिता घार्गे, उपसरपंच संतोष कमाने उपस्थित होते. (छाया : रशीद शेख)