शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; मात्र सोलापुरात देवेंद्र फडणवीसांची एकही सभा नाही!
2
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
3
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
4
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
5
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
6
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
7
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
8
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
9
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी
10
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
11
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
12
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
13
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
14
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
15
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
16
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 
17
आधी मलिदा काढला, सत्ता गेल्यावर विरोध सुरू; शिंदेंचा मविआवर घणाघात  
18
स्वेच्छानिवृत्ती किंवा बदली; तिरुपती बालाजी मंदिरातील गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश
19
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
20
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."

वैद्यकीय क्षेत्रात संशोधन व्हावे - नितीन गडकरी

By admin | Published: July 09, 2016 11:18 PM

सध्या देशात डॉक्टरांचा अभाव आहे शिवाय उपचारसुद्धा महाग आहे. यामुळे गरिबांना कॅन्सर सारख्या रोगावर उपचार घेता येत नाही. मात्र कॅन्सरची झपाट्याने वाढ होत आहे.

संजय पाटील -- कऱ्हाड --साप हा शेतकऱ्यांचा मित्र असला तरी त्याचा दंश मात्र विषारी आहे़ एरव्हीपेक्षा पावसाळ्यामध्ये सर्पदंशाच्या घटना सर्रास घडतात़ त्यापाठीमागील कारणे अनेक असली तरी हा दंश शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत असल्याचे काही घटनांवरून स्पष्ट झाले आहे़ जून महिन्यात कऱ्हाड तालुक्यात तब्बल ६० जणांना सर्पदंश झाला आहे. त्यातील काहीजणांना आपला जीवही गमवावा लागला आहे.  कऱ्हाडच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये गेल्या महिन्यात सर्पदंश झालेल्या तब्बल ४५ तर कृष्णा रुग्णालयात १५ शेतकऱ्यांवर उपचार करण्यात आले आहेत़ वेळेवर उपचार झाल्याने त्या ६० जणांचा जीव वाचला़ वास्तविक, जिल्ह्यामध्ये आढळणाऱ्या सापांच्या जातीमध्ये हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच साप विषारी आहेत़ बहुतांश सापांचा दंश माणसासाठी जीवघेणा ठरू शकत नाही़ शास्त्रीय भाषेत त्याला ‘ड्राय बाईट’ असे म्हणतात़ जिल्ह्यात आढळणारे धामण, दिवंड, पाणदिवंड, गवत्या, शेवाळी, कुकरी, तस्कर, कवड्या, उडता सोनसर्प, मांडूळ, डुरक्या हे साप बिनविषारी आहेत तर काळा नाग, एकाक्ष नाग, चष्मा नाग, मण्यार, घोणस, पोवळा हे साप विषारी आहेत़ पावसाळ्यामध्ये जमिनीवर सर्वत्र चिखल आणि ओलसरपणा असतो़ परिणामी, साप निवारा शोधण्यासाठी शेताच्या बांधावरील पाचटीचा, दगड-विटांचा ढीग, सरपण अथवा पडक्या घरात आश्रय घेतात़ शेतकरी शेतामध्ये गेल्यानंतर अजाणतेपणी त्याच्याकडून साप डिवचला जातो़ परिणामी, स्वत:च्या बचावासाठी साप आक्रमक होऊन दंश करतात़ दंश झाल्यानंतर रुग्णाला तातडीने वैद्यकीय मदत मिळणे गरजेचे असते़ त्वरित वैद्यकीय मदत मिळाली तर संबंधित व्यक्तीचा जीव वाचतो. मात्र, अनेकवेळा मदत न मिळाल्यानेच जीव गमवावा लागतो. उन्हाळ्यासह हिवाळ्याच्या कालावधीतही सर्पदंशाच्या घटना घडतात. मात्र, त्या घटनांचे प्रमाण कमी असते. त्या तुलनेत पावसाळ्यात सर्पदंशाचे प्रमाण जास्त असते. पावसाळ्याच्या सुरुवातीला शेतकऱ्यांची शेतीची मशागत किंवा पेरणी, टोकणीची कामे सुरू असतात. त्यामुळे शिवारात शेतकऱ्यांसह मजुरांची वर्दळ जास्त असते. याच कालावधीत निवारा न मिळाल्याने सर्प शिवारात पाचटीचा ढिगारा किंवा इतर आडोसा शोधतात. कामाच्या धांदलीत शेतकऱ्याची त्याठिकाणी वर्दळ झालीच तर त्याला सर्पाकडून दंश केला जातो. कऱ्हाडच्या उपजिल्हा रुग्णालयासह कृष्णा रुग्णालयात सर्पदंशाच्या रुग्णांवर तातडीने उपचार केले जातात. त्यासाठी काहीवेळा सर्पमित्रांचीही मदत घेतली जाते. एखाद्याला साप चावल्यास दंशाच्या खुणा व रुग्णाची परिस्थिती यावरून सर्पमित्र दंश करणाऱ्या सापाची जात सांगू शकतात. ज्यामुळे डॉक्टरांना संबंधित रुग्णावर उपचार करणे सोपे जाते.सर्पदंशानंतर प्राथमिक उपचारांची गरजशेतात काम करताना किंवा त्वरित वैद्यकीय मदत मिळणार नाही अशा ठिकाणी असताना सर्पदंश झाल्यास स्वत:च प्राथमिक उपचार करणे गरजेचे असते. सर्पदंश झाल्यास दंश केलेली जागा त्वरित वाहत्या पाण्यामध्ये धरावी अथवा पाण्याने जखम स्वच्छ धुवून घ्यावी़ त्यानंतर त्या जागेवर कापडाने आवळपट्टी बांधावी़ ती पट्टी दर २० मिनिटांनी १ मिनिटासाठी सैल करून पुन्हा पूर्ववत बांधावी़ ज्यामुळे सर्पविष रक्तात मिसळणे थांबते. साप दिसला... सर्पमित्रांना बोलवा!सापाचा दंश जीवघेणा असला तरी सापाला वाचविणे, प्रत्येकाचे कर्तव्य आहे़ साप मारल्यामुळे सापांच्या अनेक जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत़ त्यामुळे कोठेही साप दिसला तरी त्याला न मारता सर्पमित्रांना बोलावून त्याला सुरक्षितस्थळी सोडणे गरजेचे आहे़ कऱ्हाडसह परिसरात सध्या अनेक सर्पमित्र कार्यरत आहेत. प्रतिसर्पविष हेच एकमेव औषधसर्पदंश झाल्यानंतर अनेकवेळा रुग्णावर घरगुती किंवा पारंपरिक उपचार केले जातात. कधीकधी बिनविषारी सर्प चावला असताना केले जाणारे हे घरगुती उपचार योग्य ठरत असल्याचा समज होतो. मात्र, विषारी सर्प चावल्यानंतर असे उपचार केल्यास ते रुग्णासाठी घातक ठरू शकतात. सर्पदंशावर प्रतिसर्पविष हे एकमेव औषध असल्याने रुग्णाला तातडीने रुग्णालयात हलवणे गरजेचे आहे. रुग्ण वेळेत रुग्णालयामध्ये पोहोचला आणि त्याच्यावर तातडीने उपचार सुरू झाले तरच त्याच्यावरील संकट टळते.