लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : शासनाच्या अमृत योजनेतून साताºयासाठी भुयारी गटार योजना मंजूर झाली आहे. शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम करताना रस्ते खुदाईमुळे सातारकरांना त्रास सहन करावा लागला होता. त्यामुळे भुयारी गटार योजनेचे काम करताना एकदम रस्ते खुदाई न करता आवश्यक तिथेच खुदाई करा. सातारकरांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, याची दक्षता घेऊन योजनेचे काम वेळेत पूर्ण करा, अशा सूचना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाºयांना केल्या.
सातारा शहरासाठी मंजूर झालेल्या भुयारी गटार योजनेसंदर्भात आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी प्राधिकरणाच्या अधिकाºयांची बैठक बोलावली होती. अधिकाºयांना सूचना करताना आमदार शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी पालिकेचे विरोधी पक्षनेते अशोक मोने, नगरसेवक शेखर मोरे-पाटील, शकील बागवान, बाळासाहेब खंदारे, अतुल चव्हाण, दीपलक्ष्मी नाईक, लीना गोरे, मनिषा काळोखे, संगीता धबधबे, सोनाली नलवडे, प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता आर. बी. आंटद, जगताप उपस्थित होते.
आंटद यांनी प्रस्तावित भुयारी गटार योजनेबाबत नकाशाद्वारे सविस्तर माहिती दिली. दोन-अडीच वर्षांपासून शासनाने अमृत योजनेतून राज्यातील पालिकांच्या भुयारी गटार योजनेला मंजुरी देण्यास सुरुवात केली आहे. याच योजनेत सातारा शहराच्या भुयारी गटार योजनेचा समावेश आहे. २०५० वर्षांची लोकसंख्या लक्षात घेऊन या योजनेचे काम होणार आहे. ओढे, नाले स्वतंत्र असून, भुयारी गटार योजनेसाठी स्वतंत्र वाहिनी टाकण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात ५०.३० कोटी रुपयांचे काम केले जाणार असून, हे काम करताना रस्ते खुदाई होणार असल्याचे आंटद यांनी सांगितले.
पाणीपुरवठा योजना आणि भुयारी गटार योजना मंजुरीचे प्रस्ताव एकत्रच पाठविले होते. मात्र, पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्याशिवाय भुयारी गटार योजनेला मंजुरी दिली जात नसल्याने ही योजना शासनाने आता मंजूर केली आहे. योजनेसाठी रस्ते मधोमध खोदावे लागणार आहेत.रस्ते खुदाईमुळे नागरिकांना त्रास होणार नाही, याची दक्षता घेणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे प्राधिकरणाने नगरपालिकेकडे काम आहे, असे म्हणून आपली जबाबदारी झटकू नये. काम दर्जेदार होण्यासाठी प्राधिकरणाच्या अधिकाºयांनी कामावर लक्ष ठेवावे. या योजनेचा फायदा सातारकरांना होणार असल्याने सातारकरही या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सहकार्य करतील, असा विश्वास आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यावेळी व्यक्त केला.कधी नव्हे ते सातारकरांना श्रेय मिळालेभुयारी गटार योजनेचे श्रेय सातारकरांना दिल्याचे वृत्तपत्रात वाचले. कधी नव्हे ते एका चांगल्या कामाचे श्रेय सातारकरांना मिळाले, हे वाचून आनंद झाला. चांगली कामे होतात, त्याचे श्रेय लाटायचे एवढेच काही लोकांना जमते. पालिकेत काही विद्वान मंडळी आहेत. जे नेत्यांना खूश करण्यासाठी काहीही करत असतात. भुयारी गटार योजनेचा प्रस्ताव प्राधिकरणाकडून महाराष्ट्र शासनाकडे आणि त्यानंतर केंद्राकडे गेला. मात्र, त्या विद्वानांनी नेत्यांना खूश करण्यासाठी सदर योजना थेट केंद्रातून आल्याचे सांगितले आणि श्रेय लाटण्याचा उद्योग झाला. सातारकरांना श्रेय दिल्याने सत्तेत असणाºयांना थोडीफार समज आली, असे म्हणावे लागेल, असा उपरोधिक टोला आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी लगावला.