शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
2
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
4
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
6
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
7
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
8
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
9
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
10
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
11
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
12
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
13
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
14
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
15
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
16
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
17
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
18
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
19
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
20
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला

भ्रष्टाचाराबाबत तुम्ही गप्प का?

By admin | Published: November 16, 2016 10:59 PM

शिवेंद्रसिंहराजे भोसले : मनमानी कारभाराला विरोध केल्यानेच नगरसेवकांविरोधात आरोप

सातारा : सातारा पालिकेसाठी मनोमिलन व्हावे, अशी माझी इच्छा होती. एकत्रित निवडणूक लढविण्यासंदर्भात डी. जी. बनकर यांच्याशी चर्चा केली. लहान बंधू म्हणून, मी दोन वेळा खा. उदयनराजेंना फोन केला मात्र त्यांनी फोन घेतला नाही. मनोमिलन का तुटले याची मला माहिती नाही असा खुलासा आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान दहा वर्र्षांत माझ्या नगरसेवकांनी काय भ्रष्टाचार केला आहे, तो खुशाल जनतेसमोर मांडावा, असे जाहीर आव्हान खासदार उदयनराजे भोसले यांना दिले. पालिका निवडणुकीच्या मनोमिलनासंदर्भात बोलताना आ. शिवेंद्रसिहराजे म्हणाले, ‘मनोमिलनासाठी माझ्याकडून कसलेही प्रयत्न कमी पडले नाहीत. निवडणूक एकत्रित लढण्याची माझी शेवटपर्यंत तयारी होती. मात्र दोन वेळा मी चर्चेसाठी गेलो; परंतु प्रतिसाद मिळाला नाही. दहा वर्षे मनोमिलन असताना सर्वच एकत्रित कारभार सुरू होता. मग आमच्या नगरसेवकांनी भ्रष्टाचार केला असे कसे म्हणता येईल. भ्रष्टाचार केला तर मग तुम्ही गप्प का बसला ? असा मुद्दा उपस्थित करून ते म्हणाले, फिश मार्केट उभारणीला आमच्या नगरसेवकांनी आडकाठी घेतली होती. वेदांतिकाराजे म्हणाल्या, ‘दहशतमुक्त सातारा याचा अर्थ विरोधकांनी वेगळा घेतला आहे. सातारा एमआयडीसीमध्ये खंडणीचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे उद्योजकांना त्याचा त्रास होत आहे. खंडणी मागणारे कोण आहेत याचे आत्मपरीक्षण विरोधकांनी करावे. रेमंण्ड सारखी मोठी कंपनी साताऱ्यात येणार होती. मात्र खंडणीच्या प्रकारांमुळे आली नाही. माझा स्वभाव ‘कडक’ आहे असा अप्रचार सुरू आहे. असे असते तर मी २५ वर्षे संसार केला असता का? मी ‘कर्तबगार’ आहे याची धास्ती विरोधकांनी घेतली असे वाटत आहे असे स्पष्ट करून वेदांतिकाराजे म्हणाल्या, सातारकरांना ‘कर्तबगार’ नगराध्यक्ष नको आहे का? असा सवाल करून मी नगराध्यक्ष झाले पालिकेत बसून काम न करता पाच वर्षात प्रत्येक प्रभागात फिरून नागरीकांचे प्रश्न जाणून घेवून काम करणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)प्रचाराला आमचे नगरसेवक कसे चालतात?फिश मार्केट आहे तेथेच मार्केट उभारण्यात यावे अशी आमची मागणी होती. अशा अनेक मनमानी कामांच्या आड आमचे नगरसेवक येत होते. ते त्यांना खटकत होते. निवडणुका आल्या की, आमच्या नगरसेवकांचा भ्रष्टाचार बाहेर काढतो असे म्हणने चुकीचे आहे. त्याच भ्रष्टाचार करणाऱ्या नगरसेवकांनी तुमच्या खासदारकीच्या निवडणुकीत प्रचार केलेला कसा चालतो. आमच्या नगरसेवकांनी केलेला भ्रष्टाचारावर त्यांनी बोलावे, आम्हाला काही फरक पडत नाही. त्यांच्या मनमानी कारभाराच्या आड आमचे चार, पाच नगरसेवक येत होते ही त्यांना मोठी अडचण होती, असेही शिवेंद्रसिंहराजेंनी स्पष्ट केले.