सातारा : कोरोना विषाणूला निपटण्यासाठी राज्यातील डॉक्टरांना पुण्यात प्रशिक्षण दिले गेले. गुरुवारी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला साताºयातील डॉक्टरही उपस्थित राहिले होते.
कोरोना विषाणूमुळे सध्या सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ज्या पद्धतीने स्वाईन फ्लूची लक्षणे आढळून येत होती, त्याच पद्धतीने कोरोनाची लक्षणे आढळून येत आहेत. मात्र, यावर आणखी काही वेगळ्या पद्धतीने उपचार करण्याची गरज आहे का? तसेच या कोरोना व्हायरसला निपटण्यासाठी डॉक्टरांनी कशा पद्धतीने सामोरे गेले पाहिजे, याचे प्रशिक्षण गरजेचे होते. हे प्रशिक्षण सध्या गुरुवारी पुण्यामध्ये पार पडले. या प्रशिक्षणाला साता-यातील काही डॉक्टरही उपस्थित राहिले होते.
सकाळी दहा ते सायंकाळी सहापर्यंत ही कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेमध्ये दिलेल्या टिप्स आणि उपचारावर डॉक्टरांकडून भर दिला जाणार आहे. शनिवार, दि. १४ रोजी सातारा जिल्'ातील प्राथमिक आरोग्य अधिकारी, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.