लोकमत न्यूज नेटवर्ककातरखटाव : येथील डॉ. प्रदीप पाटील (मूळ वाळवा तालुका) यांचा मुलगा संचार प्रदीप पाटील (वय १८ ) याने सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास बारा बोअरच्या रायफलने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेमुळे कातरखटावसह परिसरात खळबळ उडाली आहे.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, डॉ. प्रदीप पाटील आणि त्यांचा मुलगा संचार पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून घरात दोघेच राहत आहेत. संचार याने बीएससीची परीक्षा दिली होती. त्याचा नुकताच निकाल लागला होता. या परीक्षेत नापास झाल्याचे समजल्यामुळे तो निराश झाला होता. नैराशेपोटी त्याने सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास राहत्या घरात बारा बोअरच्या रायफलने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. हनुवटीखाली गोळी शिरल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच वडूज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. दरम्यान, संचार याने आत्महत्या करण्यासाठी वापरलेली रायफल पोलिसांनी जप्त केली असून, वडूज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेचा अधिक पुढील तपास पोलिस निरीक्षक यशवंत शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार धनाजी वायदंडे करीत आहेत.
रायफलने गोळी झाडून डॉक्टरच्या मुलाची आत्महत्या
By admin | Published: June 12, 2017 11:25 PM