सागर गुजर ।कोरोना लॉकडाऊनमध्ये सातारा शहरासह जिल्ह्यातील सर्वच व्यापाऱ्यांनी सुज्ञ भूमिका घेतली. व्यवसाय बंद राहिले तरी गोरगरिबांचे संसार सुरू ठेवण्यासाठी त्यांना मोफत जीवनावश्यक वस्तू पुरविल्या. व्यापारी, जनतेला वेठीस न धरताही प्रशासन कोरोनाविरुद्धची लढाई जिंकू शकते.
प्रश्न : कोरोना महामारीच्या काळात संघटनेतर्फे कशी मदत झाली?उत्तर : सातारा चेंबर आॅफ कॉमर्सने लॉकडाऊनच्या काळात आपले उत्तरदायित्व समर्थपणे पार पाडले. कामगार लोकांना जेवण पुरविले. त्यांच्या परतीच्या प्रवासासाठी उपाययोजना केली. प्रशासनाच्या सूचनांनुसार जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा मोफत केला. नगरपालिकेकडे गहू, तांदूळ, ज्वारी, आटा या जीवनावश्यक वस्तू दिल्या.
प्रश्न : आपल्या संघटनेशी कोणकोणते व्यापारी संलग्नित आहेत?उत्तर : आपल्या संघटनेशी शहरातील २२ व्यापारी संघटना संलग्नित आहेत. त्यामध्ये किराणा, हार्डवेअर, कापड व्यापारी, सॅनिटेशन, इलेक्ट्रॉनिक, फटाका, पान टपरी, स्वीट मार्ट, हॉटेल व्यावसायिक, पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर, बेकरी, लेबर कॉन्ट्रॅक्टर, आर्किटेक्चर असोसिएशन, बिल्डर असोसिएशन, आॅटोमोबाईल, गॅरेजचालक, सिमेंट असोसिएशन, राजधानी व्यापारी संघ आदींचा समावेश आहे.
प्रश्न : व्यापाºयांसमोर कुठल्या अडचणी आहेत?उत्तर : लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवसाय ठप्प झाले आहेत. व्यावसायिकांचे कर्जाचे हप्ते थकले आहेत. घर, बँका, गाडीचे हप्ते गेले नाहीत. अनेक पतसंस्था अथवा बँकांतून व्यापारी खेळत्या भांडवलासाठी कॅश क्रेडिटने व्यवहार करतात, ते ठप्प झाले. व्यावसायिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला.
पुणे-मुंबईवर अवलंबित्वडिस्ट्रिब्युटरला वाहनांचे परवाने मिळत नाही. आता माल यायला लागला आहे. जास्त दरात माल खरेदी करावा लागला. पुणे-मुंबई बंद असल्याने सातारा जिल्ह्यात मोजकाच माल येत आहे. पुणे-मुंबईची बाजारपेठ बंद राहिल्याने त्याचा दूरगामी परिणाम सातारा शहरासह इतर शहरांमध्ये झाला आहे. ७० टक्के माल पुणे-मुंबईतून येतो. खरेदीला पुणे, मुंबईत जास्त लोक जातात.
शेतीची कामे थांबल्यानेही फटकाशेतीची कामे थांबल्याने हार्डवेअरच्या दुकानांना आर्थिक मंदीचा फटका बसला आहे. व्यापारात उलाढाल कमी झाली. किराणा व्यवसायात नफ्याचे प्रमाण कमी आहे. कृत्रिम तुटवडा असून, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी लक्ष घालून होलसेल विक्रेत्यांवर निर्बंध आणावेत, त्यांनी किरकोळ लोकांना माल देऊ नये, होलसेल व्यापार करावा, असे निर्देश द्यावेत.
साताऱ्यातील व्यापाऱ्यांनी कोरोनाच्या महामारीत कायमच सहकार्याची भूमिका घेतली. प्रशासनाचेही व्यापा-यांना सहकार्य मिळणे जरुरीचे आहे. सतत नवीन आदेश निघाले तर अडचणी निर्माण होतात. महामारीशी लढताना सांघिक प्रयत्न आवश्यक आहेत.- राजू गोडसे, अध्यक्ष, सातारा चेंबर आॅफ कॉमर्र्स