"मी सहकारातील निवडणुकीत सहसा सहभाग घेत नाही. परंतु राज्यात अनपेक्षित सत्तांतर झाले. यामुळे सहकारी क्षेत्रात अपप्रवृत्ती डोकावू पाहत आहेत. केंद्र व राज्याची चौकशी यंत्रणा राजकीय नेत्यांना त्रास देत आहेत. यातून सहकारी क्षेत्रात त्यांना सत्ता घ्यायची आहे. हा केंद्र व राज्यातील पॅटर्न बघून मी कराड शेती उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांच्या हितासाठी राहिली पाहिजे. तिचे राजकीय भक्षण करू नये, यासाठी मी थेट निवडणुकीत उतरलो आहे. या निवडणुकीतील विजय विलासराव पाटलांना श्रद्धांजली ठरेल," असे प्रतिपादन आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा प्रचार प्रारंभ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.उदयसिंह पाटील - उंडाळकर, तसेच पॅनेलचे सर्व उमेदवार उपस्थित होते.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, खरेतर कराड बाजार समिती बिनविरोध व्हायला हवी होती. ही संस्था वाचवली पाहिजे. या भावनेतून आम्ही एकत्र आलो आहोत. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेवून निवडणूक विलास काकांना श्रद्धांजली ठरणार आहे. सार्वजनिक निवडणुकीत यश मिळत नसल्याने प्रतिगामी विचार सहकारात येवू पाहत आहे. देशात जे काही चालले आहे. त्याची अप्रत्यक्ष उजळणी होणार आहे. सर्वसामान्यांचे हकक, अधिकार धोक्यात आले आहेत. याचा विचार या निवडणुकीत केला पाहिजे. बाजार समितीची निवडणूक गांभीर्याने घेवून आपण विजयी होवू.
अजितराव पाटील - चिखलीकर म्हणाले, लोकनेते विलासराव पाटील - उंडाळकर यांनी कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या बैल बाजारासाठी पन्नास एकर जमीन आरक्षित केली. विलासकाकांचे बाजार समितीमधील योगदान महत्त्वाचे आहे. मग या निवडणुकीत गाय रुतली आणि वासरू पुढे निघून गेले, ही अवस्था विरोधकांमध्ये आहे.
तर दररोज १०० बिसलरीच्या बॉटल्या लागतीलया निवडणुकीत सरंजामदारांचे पॅनेल निवडून दिले तर बाजार समिती दररोज बिसलरीच्या शंभर बाटल्या आणाव्या लागतील. कारण त्यांना साधे पाणी चालत नाही अशी टीका अजितराव पाटील चिखलीकर यांनी नाव न घेता डॉ. अतुल भोसले यांच्यावर केली.