जावेद खान
लाेकमत न्यूज नेटवर्क
सातारा : साताऱ्यातील यवतेश्वर डोंगराला गेल्या काही दिवसांपासून विघ्नसंतोषींकडून वणवा लावला जात आहे. या डोंगराला बुधवारी सायंकाळी सहा वाजता लागलेला वणवा पहाटे चार वाजले तरी सुरूच होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही या डोंगराला वणवा लावण्यात आला होता. यामध्ये मौल्यवान वनसंपदा जळून खाक होत असून, हे पर्यावरणप्रेमींना पाहवत नाही.
०१ वणवा ०१
यवतेश्वर डोंगराला गुरुवारी वणवा लावण्यात आला होता. त्यामुळे कित्येक क्षेत्रातील गवत जळून खाक झाले होते. यामुळे चारा नष्ट झालेला असतानाच प्राणीही मृत्यूमुखी पडले आहेत.
०१ वणवा ०२
या वणव्यामुळे सातारा - कास मार्गावर मोठ्या प्रमाणावर धुराचे लोळ उठले होते. यामुळे वाहनचालकांना या मार्गावरुन गाड्या चालवताना अडचणींचा सामना करावा लागत होता. अनेकांना श्वास घेतानाही त्रास होत होता.
०१ वणवा ०३
मौल्यवान वनसंपदा जळून खाक झाल्याचे समजल्यानंतर काहींनी अग्नीशमन दलाला याची माहिती दिली. त्यानंतर अग्नीशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी ही आग विझवली.