खटाव : ‘कोरोनाशी एकीकडे सर्वांचाच लढा सुरू आहे. त्यातच आरक्षणाचा निर्णय आल्यामुळे सगळीकडेच वातावरण तणावपूर्ण आहे. अशातच डिजिटल मीडियावर एकमेकांच्या भावना दुखावल्या जातील, आशा आक्षेपार्ह पोस्ट टाकून तेढ वाढविण्याचा प्रयत्न कोणीही करू नये,’ असे आवाहन पुसेगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक चेतन मछले यांनी केले आहे.
खटावमधील मराठा मंडळाच्या कार्यकर्त्यांची झालेल्या चर्चेत मछले यांनी युवकांना आरक्षण हा मुद्दा सर्वांच्या दृष्टीने अंत्यत महत्त्वाचा आहे; परंतु भावनेच्या आहारी जाऊन असे कोणतेही पाऊल उचलले गेले तर त्याचा समाजमनावर विपरीत परिणाम होतो आणि परिस्थिती अधिकच किचकट व गुंतागुतींची होते, या परिस्थितीत कोणीही ग्रुपवर आक्षेपार्ह मेसेज टाकणार नाही, याची जबाबदारी प्रमुख कार्यकर्त्यांची राहील. तसेच पोलीस स्टेशनचा एक प्रतिनिधी त्या ग्रुपमध्ये असेल, जे ग्रुपवरच्या हालचाली वर बारीक लक्ष ठेवून आहेत, असेही यावेळी मछले यांनी सांगितले.
यावेळी उपसरपंच अमर देशमुख, अशोक कुदळे, राहुल देशमुख, योगेश शिंदे, सचिन जगताप आदी उपस्थितीत होते.
०९खटाव पोलीस चर्चा
कॅप्शन : खटावमध्ये मराठा समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करताना सहायक पोलीस निरीक्षक चेतन मछले व सहकारी उपस्थित होते.