शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
4
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
5
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
6
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
7
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
8
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
9
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
10
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
11
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
12
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
13
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
14
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
15
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
16
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
17
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
18
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
19
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
20
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

'तुम्ही, काळजी करू नका; मुंबईतलं सगळं नीटनेटकं करतो'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 5:10 PM

जमिनीचे तुकडे होत चालल्याने शेतकऱ्यांच्या मुलांनी इतर व्यवसायाकडेही वळले पाहिजे.

ठळक मुद्देबाळासाहेब पाटलांच्या मंत्रिपदाचे दिले संकेत

कराड : तुम्ही उसाचं वजन कसं वाढंल, याची चर्चा करा. मुंबईत सध्या काय चाललंय, त्याची चर्चा करत बसू नका. मी ते सगळं नीटनेटकं करतो. त्याची काळजी करू नका. फक्त आमदार बाळासाहेब पाटील यांना तेवढं इथल्या जबाबदारीतून मुक्त करा, असे सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकप्रकारे राज्यात आपलेच सरकार येणार, असा विश्वास व्यक्त केला. तर बाळासाहेब पाटील यांच्या मंत्रिपदाचे संकेतही त्यांनी दिले.

यशवंतनगर, ता. कराड येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचा ४६ वा गळीत हंगाम प्रारंभ शरद पवार यांच्या हस्ते सोमवारी पार पडला. यावेळी सह्याद्री कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटनही पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. खासदार श्रीनिवास पाटील अध्यक्षस्थानी होते. तर माजी सहकारमंत्री डॉ. एन. डी. पाटील यांची प्रमुख उपस्थित होती. शरद पवार म्हणाले, आपण शेतीकडे व्यवसाय म्हणून बघितले पाहिजे; पण आता शेतकऱ्यांच्या सगळ्याच पोरांनी शेती करण्याचे दिवस राहिलेले नाहीत. जमिनीचे तुकडे होत चालल्याने शेतकऱ्यांच्या मुलांनी इतर व्यवसायाकडेही वळले पाहिजे.

खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, सह्याद्रीवर येता घाला, सह्यगिरी हा धावून गेला हा यशवंतराव चव्हाणांचा इतिहास आहे. तोच कणखर बाणा आज शरद पवारांच्या रुपाने आपल्याला पाहायला मिळत आहे.

आमदार बाळासाहेब पाटील म्हणाले, आम्ही मंडळी दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने जाणारी आहोत. तो विचार पुढे नेण्याचे काम शरद पवार करीत आहेत. त्यामुळे आम्ही त्यांची साथ कदापि सोडणार नाही. आम्हालाही सत्तेची स्वप्ने दाखविली गेली होती; पण आम्ही विचारापासून ढळणार नाही.

कार्यक्रमाला आमदार मोहनराव कदम, प्रभाकर देशमुख, अरुण लाड, सत्यजित पाटणकर, राजेश पाटील-वाठारकर, नितीन पाटील, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष सुनील माने, रावसाहेब पाटील, नितीन पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी स्वागत केले. आमदार बाळासाहेब पाटील यांनी प्रास्ताविक केले.बक्षीस घ्यायचा कंटाळा येत नाही का?सह्याद्री सहकारी साखर कारखाना हा अतिशय उत्तम चाललेला कारखाना आहे. त्यामुळे प्रत्येकवर्षी त्याला शासनाचा कोणतातरी पुरस्कार मिळतच असतो. बऱ्याचदा वितरणाला मीच असतो. तेव्हा एकदा मी बाळासाहेबांना म्हटलं की, तुम्हाला बक्षीस घ्यायचा कंटाळा येत नाही का? जरा दुसऱ्यांना मिळू द्या, त्यावर एकच खसखस पिकली.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारBalasaheb Patilबाळासाहेब पाटीलPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेस