कोयनानगर : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असून, धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे सहा वक्री दरवाजे आज, शनिवारी सकाळी सहा वाजता उचलले. तसेच पायथा विद्युतगृहातून मिळून १६ हजार २४५ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. कोयना धरणात सध्या ९९.५९५ टीएमसी (९९.४७ टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे. धरणात सध्या २२ हजार ६८३ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. आज सकाळी सहा वाजता धरणाचे सहा दरवाजे दीड फुटावर उचलून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूकरण्यात आला. वक्री दरवाजांतून १४ हजार १३४ क्युसेक आणि पायथा विद्युतगृहातून २ हजार १११ क्युसेक याप्रमाणे एकूण १६ हजार २४५ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. आज सकाळी आठ वाजेपर्यंत (आजअखेर) पडलेला पाऊस मिलिमीटरमध्ये असा : कोयनानगर ६४ (४४९९), नवजा १६ (५४१५), तर महाबळेश्वर येथे ९६ (४३१२).
उघडले कोयनेचे ‘दार’!
By admin | Published: September 07, 2014 12:02 AM