सातारा : कोयना धरणात पाण्याची आवक सुरू असल्याने गुरूवारी दुपारी १२ च्या सुमारास दरवाजे अडीच फुटापर्यंत उघडण्यात आले आहेत. त्यामुळे धरण दरवाजा आणि पायथा वीजगृह असे दोन्ही ठिकाणाहून २५ हजार ४५१ क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू झाला आहे.
जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरू आहे. त्यामुळे कोयना धरणात पाण्याची आवक सुरू आहे. सध्या धरणात सुमारे २५ हजार क्युसेक पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढू लागला आहे. बुधवारपेक्षा गुरूवारी धरणातील साठा वाढला असून तो १०५ टीएमसी इतका झाला आहे.
बुधवारपासून धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. गुरूवारी दुपारी बाराच्या सुमारास धरणाचे दरवाजे दोन फुटावरुन अडीच फुटापर्यंत वरती नेण्यात आले आहेत. सध्या दरवाजातून २३ हजार ३५१ आणि पायथा वीजगृहातून २१०० असा २५ हजार ४५१ क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे.