लोकमत न्यूज नेटवर्कपुसेगाव : फटाक्ंयाचा धुमधडाका नाही,की नाही घोडा वाजंत्रींचा डामडौल, ना मंडप लाऊडस्पीकरचा, जेवणाचाखर्च, ब्राम्हणांसह परीट, गुरव आदी लोकांची सुविधा मोफतच! हार तुरे बाशिंगे एवढचं नव्हे तर लग्नाचे फोटो व विवाह सोहळ्याचे व्हीडीओ शुटींगला एक ही रूपया खर्च नाही. नववधुवरांना संपुर्ण पोशाख आणि त्यांच्या संसारासाठी भांडी सेटही सप्रेम भेट !!! ही आॅफर होती नेहमीच सामाजिक कार्यात एक पाऊल पुढे असलेल्या पुसेगाव ता. खटाव येथील श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचीगुरूवार दि. १५ जुन रोजी दुपारी २ वाजून १८ मिनीटांनी श्री सेवागिरी मंदिर तीर्थक्षेत्र पुसेगाव, ता. खटाव येथे श्री सेवागिरी महाराजांच्या साक्षीने व मोफत सामुदायिक विवाह सोहळयाच्या निमित्ताने परिसरातील गोर-गरीबं चार जोडप्यांच्या संसारवेली बहरण्यास शुभमंगल सावधान म्हणत सुरूवात झाली.सामाजिक बांधिलकीचे नाते जपत येथील श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट नेहमी सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असते. पंचक्रोशीतील गोरगरीब जनतेला लग्न सोहळयाचा अफाट होणारा खर्च,झालेल्या खर्चातून त्यातून त्या कुटुंबाची होणारी वाताहात या सगळ्यां बाबी नजरेसमोर ठेऊन येथील ट्रस्टने यावर्षीपासून समाजाभिमुख असा बिगरहुंडा मोफत सामुदायिक विवाह सोहळा उपक्रम. गुरूवार दि. १५ रोजी आयोजित केला होता. ठरल्याप्रमाणे देवस्थान ट्रस्टने सकाळी सहा वाजल्यापासूनच विवाह सोहळ्याचे वातावरण निर्माण झाले होते. देवस्थानचे मठाधिपती प.पू.श्री महंत सुंदरगिरी महाराज,ट्रस्ट चेअरमन डॉ सुरेश जाधव, विश्वस्त मोहनराव जाधव, रणधीर जाधव, योगेश देशमुख, प्रताप जाधव व सुरेश शा. जाधव तसेच माजी चेअरमन सुनिलशेठ जाधव, सुरेश जाधव पाटील, सहायक पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, बजरंग देवकर, सचिव अविनाश देशमुख, देवस्थान ट्रस्टचा कर्मचारीवृंद व ग्रामस्थ आपल्या घरातीलच लग्न सोहळा आहे अशा थाटात सक्रिय झाला होता. प्रारंभी मान्यवरांच्या उपस्थितीत वऱ्हाडी मंडळीसह उपस्थितांनी हुंडाबंदी, लिंगभेद व गर्भ निदान चाचणी न करण्याची लेक वाचविण्याची व मुलींचे सवंर्धन चांगल्या पध्दतीने करण्याची शपथ घेतली. श्री सेवागिरी महाराजांच्या दारात विवाह सोहळा दुपारी २ वाजून १८ मिनिटांनी हिंंदू पध्दतीने पार पडला. विवाह सोहळ्यानंतर सर्वांना मोफत जेवणाची उत्तम सोय ट्रस्टच्यावतीने करण्यात आली होती. या नववधुवरांना आशिर्वाद देण्यासाठी श्री सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती श्रीमहंत सुंदरगिरी महाराज, ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त तसेच गावातील मान्यवर पुसेगाव व पंचक्राशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.फोटो अन् शुटींगही!देवस्थान ट्रस्टच्या वतीने गतवर्षी अशा उपक्रमाला सुरूवात झाली . आजही या सोहळ्यात पुर्ण जोशात लग्न कार्य पार पाडण्यासाठी सर्वजण धडपड करत होते. यावेळी रामचंद्र साठे (भक्तवडी) व ललीता देवकुळ े(पळशी), अमोल रोकडे (देगाव) व कोमल काटकर(वडूज), विशाल आधंळकर (सि.कुरोली) व पुजा वडगावे (मोळ) आणि प्रशांत आवळे (नाशिक) व शकुंतला यादव (नाशिक) ही चार जोडपी विवाहबध्द झाली. ट्रस्टच्यावतीने वधू वरांना संपुर्ण पोशाख, संसाररोपयोगी भांडी सेट, हार, बाशिंंगे, प्रत्येक जोडप्याचे फोटो, शुटींगची डी. व्ही. डी ची मोफत सोय या सोहळ्यात करण्यात आली होती.
सामुदायिक विवाह सोहळ्यात हुंडाबंदीची शपथ
By admin | Published: June 15, 2017 10:47 PM