औंध : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औंधसह परिसरात साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली.
औंध, जायगाव, गोपूज, पळशीसह भागातील ग्रामपंचायतीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले, तर गोपूज येथे सिद्धार्थ तरुण मंडळाच्या वतीने कोरोनाच्या नियमांचे पालन करत जयंती साजरी करण्यात आली.
भारतीय जीवन विमा कंपनीचे विकास अधिकारी बाळासाहेब किरतकुडवे, उपसरपंच ॲड. संतोष कमाने, सत्यजित गुरव, कृष्णत जाधव, जयपाल डावरे, जितेंद्र डावरे, नितीन डावरे, दादासाहेब डावरे, राजू किरतकुडवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
बाळासाहेब किरतकुडवे म्हणाले की, बाबासाहेबांचे विचार सर्वसमावेशक होते. अन्यायाच्या विरुद्ध लढण्याची दिशा त्यांनी दिली. बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यामागे उद्देश कोणता असावा हेही त्यांनी यावेळी सांगितले. उपसरपंच ॲड. संतोष कमाने, सत्यजित गुरव यांनीही मनोगत व्यक्त केले. जितेंद्र डावरे यांनी आभार मानले.
फोटो : गोपूज येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
(छाया - रशीद शेख)