शहरं
Join us  
Trending Stories
1
घोळ संपेना! मविआचा नवा फॉर्म्युला, तिघांना प्रत्येकी ९० जागा; १८ जागा मित्र पक्षांना
2
आजचे राशीभविष्य: ३ राशींना अनुकूल, आर्थिक लाभ संभवतात; सुखाचा, शांततेचा दिवस
3
मिलिंद देवरा यांना शिंदेसेनेकडून उमेदवारी? वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात रिंगणात
4
ठाण्यात मनसे-महायुती छुपी युती? ठाणे, कल्याण, डोंबिवलीत निवडणूक लढण्याची शक्यता धूसर
5
१३८ कोटींचे सोने पकडले; विशेष चारचाकी वाहनावर पुण्यात कारवाई; कायदेशीर प्रक्रिया सुरू
6
भाजप, शिंदेसेनेच्या तीव्र विरोधामुळे नवाब मलिक यांना अद्याप तरी उमेदवारी नाहीच!
7
विधानसभा निवडणूक: पोलिसांच्या नाकाबंदीत खालापूर टोल नाक्यावर दहा कोटींची चांदी जप्त
8
३६ जागांवर महायुती अन् मविआचेही ‘वेट अँड वॉच’; एकमेकांच्या उमेदवारांची प्रतीक्षा
9
राजकारणातील सर्वच पुतण्यांचा DNA एकसारखाच, अडचणीत आणाल तर...- छगन भुजबळ
10
राहुल नार्वेकरांच्या मालमत्तेत चार कोटींची वाढ; पाच वर्षात आशिष शेलारांची संपत्तीत किती वाढली?
11
रांगोळीवरही निवडणुकीचा रंग! पालघरमधील सफाळेत मतदान जनजागृतीचे अनोखे आवाहन
12
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
13
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
14
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
15
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
16
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
17
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)
18
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
19
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
20
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी

दाभोलकरांच्या विचारांचा दहा राज्यांत जागर!, ऑल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्कचा पुढाकार

By प्रगती पाटील | Published: August 20, 2022 4:23 PM

अनिष्ठ प्रथा, परंपरा समाजाला पोखरण्याचे काम करत होते. नागरिकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन काही मंडळी समाजाला अंधश्रद्धेच्या खाईत वर्षांनुवर्षे लोटत होते. हीच अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून संस्थापक कार्यवाह दिवंगत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी हाती घेतले.

प्रगती जाधव-पाटीलसातारा : अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून समाजाला विवेकवादी विचारांची देणगी देणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या मृत्यूपश्चात त्यांचे हे विचार महाराष्ट्राबाहेरही रुजू लागले आहेत. विज्ञानाच्या प्रचार आणि प्रसाराचे काम करणाऱ्या सुमारे दहा राज्यांमधील संस्थांनी विज्ञान वादाबरोबरच अंधश्रद्धा निर्मूलनाचे कामही जोमाने सुरू केले आहे. दाभोलकरांची हत्या करून त्यांचे विचार संपविण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी विवेकवादींचे हे कृतिशील उत्तर आहे.अनिष्ठ प्रथा, परंपरा समाजाला पोखरण्याचे काम करत होते. नागरिकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन काही मंडळी समाजाला अंधश्रद्धेच्या खाईत वर्षांनुवर्षे लोटत होते. हीच अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून संस्थापक कार्यवाह दिवंगत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी हाती घेतले. तरुण पिढीला वैज्ञानिक दृष्टिकोन देत असताना प्रत्येक कृतीला, घटनेला विज्ञानाची जोड देणे, ती विज्ञानाच्या फुटपट्टीने तोलण्याची शिकवण दिली. ही चळवळ हळूहळू राज्यभर पसरली.

दाभोलकरांच्या हत्येला नऊ वर्षे झाली; दाभोलकरी विचार संपवू शकले नाहीत. समाजातील तरुणाई त्यांच्या विचाराने दिवसेंदिवस प्रेरित होत आहे. आता त्यांच्या विचारांचा जागर दहा राज्यांमध्ये सुरू आहे, हे निश्चित समाजाला दिशादर्शक आहे.

डॉ. दाभोलकरांच्या साहित्याचे स्थानिक भाषेत भाषांतर..

अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम सुरू केल्यानंतर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी ‘ठरलं डोळस व्हायचं’, ‘प्रश्न तुमचा उत्तर दाभोलकरांचे’, ‘लढे अंधश्रद्धेचे, ‘श्रद्धा-अंधश्रद्धा’, ‘तीमिरातूनही तेजाकडे’, ‘अंधश्रद्धा प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम’, ‘भ्रम आणि निरास’, ‘विचार तर कराल?,’ या पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. या पुस्तकांतील काही अंशांचे स्थानिक भाषेत भाषांतर करून त्याचे वितरण करण्यात आले.यामुळे दाभोलकर भावले..!विज्ञान प्रसाराचे काम करणाऱ्या मंडळींना डॉ. दाभोलकर यांचे काम ज्ञात होते; पण त्यांच्या हत्येनंतर त्यांनी केलेल्या कामाची व्याप्ती आणि समाजाच्या निच्चतम स्तरापर्यंत रुजलेली अंधश्रद्धेची खोली लक्षात आली. विज्ञानाचा प्रसार करण्याबरोबरच अंधश्रद्धा निर्मूलन केल्याने पुढे पिढ्यानपिढ्या होणारी जागृती महत्त्वाची असल्याचे या मंडळींचे मत झाले.

तर्कशुद्ध विचार मांडण्याचा अनोखा पायंडा...

धर्माच्या नावाखाली सुरू असलेल्या अंधश्रद्धेवर घाला घालताना डॉ. दाभोलकर यांनी कायम कायद्याचा आणि संविधानाचा आधार घेत लोकांच्या मनातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी त्यांच्या समोर विज्ञानाचे प्रयोग केले. ‘चमत्कार दाखवा आणि पाच लाख जिंका’ त्यांची ही योजना तर अनेकांवर भारी पडली. अन्य राज्यांत दाभोलकर विचारांचा विस्तार होण्यामागेही काही कारणे मानली जातात.

या राज्यांत सुरू आहे, दाभोलकर विचारांचे जागरझारखंड, आंध्र प्रदेश, तेलंगाणा, पंजाब-हरयाणा, केरळ, दिल्ली, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, अरुणाचल प्रदेश

आपल्याकडे अनेकदा धर्माच्या मुळाशी अंधश्रद्धा नांदते. लोकांच्या श्रद्धेला धक्का न लावता अंधश्रद्धेचे समूळ उच्चाटन करण्याची अनोखी पद्धत डॉ. दाभोलकरांची होती. नागपूरच्या कार्यक्रमात त्यांचे पहिले व्याख्यान ऐकण्याची संधी मिळाली. यातून ऊर्जा मिळाली आणि असेच काम करण्याचे धडेही घेतले. त्यांच्या हत्येनंतर ऑल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्कच्या माध्यमातून आम्ही देशभरात त्यांच्या विवेकी विचारांचा जागर करू लागलो. -डी. एन. एस आनंद, झारखंड

टॅग्स :Satara areaसातारा परिसरNarendra Dabholkarनरेंद्र दाभोलकर