शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
3
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
4
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
5
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
6
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
7
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
8
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
9
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
10
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
11
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
12
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
13
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
14
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
15
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
16
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
17
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
18
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
19
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
20
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!

प्यायला मुबलक पाणी, पिकं मात्र तहानलेलीच!

By admin | Published: December 26, 2015 11:53 PM

शिरगाव दलित वस्ती : केंजळ जलसिंचन उपसा योजनेतून पाणी देण्याची मागणी

राहुल तांबोळी, भुर्इंज :वाई तालुक्यातील शिरगाव हे तसं सधन गाव. अंगणावरून घराची परीक्षा जसे केली जाते, तसेच या गावात प्रवेश करताना तेथील रस्त्यांवरूनच गावातील सुविधा चांगल्या असल्याचे अनुभवायला मिळाले. या गावातील दलित वस्तीतही बहुतांश सुविधा पोहोचल्या आहेत. मात्र वस्तीला लागूनच असणाऱ्या त्यांच्या शेतीला मात्र पाणी नसल्याने दलितांच्या शेतीची पाण्यावाचून परवड सुरू आहे. येथील दलितवस्तीत रस्ते डांबरीकरण, नाले, पथदिवे, पिण्याचे मुबलक पाणी या सुविधा पोहोचल्या आहेत. याबद्दल येथील ग्रामस्थांची कसलीही तक्रार नाही. मात्र डोळ्यासमोर असणाऱ्या शेतीला पाणी नसल्याने त्यांचे डोळे पाण्याने डबडबत आहेत. या वस्तीतील बहुतांश शेतकऱ्यांच्या जमिनी वस्तीलगतच आहेत. मात्र ही सारी शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. यंदा तर पावसाने हुलकावणी दिल्याने दुबार पेरणी करावी लागली. दुबार पेरणी केली असली तरी फारसे उत्पन्न हाती लागणार नाही, अशी परिस्थिती आहे. या वस्तीतील रहिवाशांच्या शेतीसाठी पाणी मिळावे, यासाठी विशेष योजना राबवावी, अशी मागणी येथील रहिवाशांमधून होत आहे. शेतीला पाणी मिळालं तर खऱ्या अर्थानं या वस्तीतील जीवन सुखकर होईल, अशी भावना रहिवाशांनी व्यक्त केली.