शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

बारा तास काम करूनही चालक-वाहक फीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2018 10:30 PM

सातारा : दहा-बारा तास एसटी चालवणं... रात्रीचं जागरण.. मिळेल तेथे मिळेल ते खाणं... एसटीच्या चालक-वाहकांना अनेक व्याधी जडणे, चिडचिडणेपणा वाढण्याच्या घटना घडतात. असे असताना राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागातील चालक-वाहक फीट अन् फाईन असल्याचे समोर आले.साताऱ्यातील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या वतीने शुक्रवारी राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा आगारातील शंभर ...

सातारा : दहा-बारा तास एसटी चालवणं... रात्रीचं जागरण.. मिळेल तेथे मिळेल ते खाणं... एसटीच्या चालक-वाहकांना अनेक व्याधी जडणे, चिडचिडणेपणा वाढण्याच्या घटना घडतात. असे असताना राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागातील चालक-वाहक फीट अन् फाईन असल्याचे समोर आले.साताऱ्यातील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या वतीने शुक्रवारी राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा आगारातील शंभर कर्मचाºयांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये त्यांची मोफत उच्च रक्तदाब व मधूमेह तपासणी करण्यात आली. राज्य परिवहन महामंडळातील चालक-वाहकांना अनेकदा बारा तासांहून अधिक तास काम करावे लागते. लांब पल्ल्याची गाडी घेऊन गेले तर ते कुटुंबीयांपासून दोन-तीन दिवस लांब असतात. त्यामुळे त्यांना वाटेत मिळेल तेथे खावे लागते. अनेक ठिकाणी चांगल्या हॉटेलची सुविधा नसल्याने वडापाव खाऊन रात्र काढावी लागते. प्रवासात जागरण करत असल्याने अनेक व्याधी जडत असतात, असा अनेकांचा अनुभव असतो. त्यामुळे चिडचिडपणे वाढणे, अपघाताच्या घटना घडत असल्याचा अंदाज व्यक्त केलाजातो.सातारा आगारातील कर्मचाºयांच्या बाबतीत मात्र चांगला अनुभव येत आहे. सुमारे शंभर कर्मचाºयांची शुक्रवारी तपासणी करण्यात आली. यामध्ये आठजणांना उच्च रक्तदाब, आठ जणांना मधुमेह तर दोन जणांना दोन्ही आजार असल्याचे दिसून आले. बदलत्या जीवनशैलीत रक्तदाब, मधुमेह असलेले रुग्ण घरोघरी दिसतात. असे असताना शंभर कर्मचाºयांपैकी सोळा रुग्ण हे प्रमाण नक्कीच चिंताजनक नाही. हे कर्मचाºयांच्यादृष्टीने आनंदाची बाब आहे. तरीही चालक-वाहकांनी सावध असणे गरजेचे आहे.यावेळी डॉ. सचिन काळे, समुपदेशक मोनाली भोसले, परिचारिका मानसी सपकाळ, सारिका माने यांनी आरोग्य तपासणी केली.कर्करोगाबाबत जनजागृतीएसटीमध्ये अनेक महिला कर्मचारीही कार्यरत आहेत. त्यांना स्तनाचा, गर्भशयाच्या कर्करोगाबाबत आरोग्य परिचारिकांनी मार्गदर्शन केले.