मसूर : किवळ गावाने एकजुटीतून दुष्काळाचा कलंक पुसून टाकला आहे. सातत्याने तीन वर्षे केलेल्या विविध कामांमुळे गाव टँकरमुक्त तर झालेच त्याबरोबरच गावातील शेकडो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्याची किमया ग्रामस्थांनी केली आहे. नुकताच या गावाला महाराष्ट्र शासनाचा राजमाता जिजाऊ व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हा द्वितीय क्रमांकाचा जलमित्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.किवळ गावाने शासन तसेच सह्याद्री कारखान्यासह विविध संस्थांच्या माध्यमातून पाणी अडवा व पाणी जिरवा मोहीम हाती घेतली. शेतीला तर पाणी नाहीच; पण पिण्याच्या पाण्यासाठीही टँकरवर अवलंबून असणाºया या गावाने कंबर कसली. पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत ५० हजार मीटर लांबीच्या ड्रीप सीसीटीचे काम केले. अनेक ठिकाणी बांध बंदिस्तीची कामे केली. २३ साखळी बंधारे उभारले. ४५ बांध बांधले. ४०० अर्दन स्ट्रक्चर बांध बांधले. ग्रामस्थांमध्ये ठिबक सिंंचनाबाबत जागृती करण्याबरोबरच सलग ३ वर्षे मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवाड करून वृक्ष संगोपनाचे काम युद्धपातळीवर केले.२०१५-१६ मध्ये शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेत शासन, सह्याद्री कारखाना व लोकसहभागातून राज्यातला पहिला ओढाजोड प्रकल्प किवळ गावाने यशस्वी केला. त्याबरोबरच १० दगडी सिमेंट बंधारे व खोलीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. २३ माती नालाबांधाचा सांडवा दुरुस्ती करून खोलीकरण करण्यात आले. ३ गॅबियन बंधाºयाबरोबरच तलावातील गाळ काढून खोली वाढविण्यात आली. अशी विविध कामे पूर्ण केल्याने पूर्वीपेक्षा २०० हेक्टर जादा क्षेत्र ओलिताखाली नेण्यास मदत झाली. त्यामुळे लोकसहभागातून ऐतिहासिक कामे करणाºया किवळ गावास जिल्हास्तरीय जलसिंचन पुरस्कार मिळाला आहे.पंधरा हजारनागरिकांनी दिली भेटकायम दुष्काळी शिक्का असलेल्या किवळ गावाने केलेली ऐतिहासिक क्रांती पाहण्यासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह सुमारे १५ हजार लोकांनी गत ३ वर्षांत भेट देऊन गावाने केलेल्या जलसंधारण कामाची पाहणी केली. गावाने मनावर घेतले तर कोणतेही काम अवघड नाही, अशी किवळकरांची प्रशंसा करून केलेल्या कामाची नागरिकांकडून पोचपावती देण्यात आली.
कायम दुष्काळी गाव बनले पाणीदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 12:30 AM