शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

माण, खटावसह सातारा जिल्ह्यात दुष्काळी ‘ढग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 10:39 PM

नितीन काळेल । सातारा : जिल्ह्यात वेळेत हजेरी लावलेल्या पावसाने पश्चिम भाग वगळता पूर्वेकडे कायमच उघडीप दिली. त्यामुळे पूर्व ...

नितीन काळेल ।सातारा : जिल्ह्यात वेळेत हजेरी लावलेल्या पावसाने पश्चिम भाग वगळता पूर्वेकडे कायमच उघडीप दिली. त्यामुळे पूर्व भागातील माण, खटाव, कोरेगावसह इतर तालुक्यांत सद्य:स्थितीत दुष्काळी ‘ढग’ दाटून आले आहेत. आगामी काळात तर जिल्ह्यातील इतर भागातही भीषण स्थिती निर्माण होणार आहे. सध्या पूर्व भागात रब्बीची पेरणी आणि जनावरांचा चारा, पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.दरम्यान, जिल्ह्यातील तीन तालुक्यांतील १५ गावे आणि ५५ वाड्या-वस्त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. यामध्ये आगामी काळात आणखी वाढ होणार आहे.यावर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सातारा जिल्ह्यात पाऊस सुरू झाला. पेरणीनंतर पूर्व भागातील माण तालुक्यात पाऊस बरसलाच नाही. त्यामुळे हाती फारसे उत्पन्न आले नाही. पाऊस नसल्याने लहानांसह मोठ्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. तर माणमध्ये आत्तापर्यंत २२४ मिलीमीटर पाऊस झाला असून, हे प्रमाण ५५ टक्के आहे. खटाव तालुक्यात आतापर्यंत ४३९ मिलीमीटर पाऊस झाला आहे.या तालुक्यात पावसाचे प्रमाण चांगले असले तरी काही भागात अत्यल्प पाऊस झाला आहे. यामुळे टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. फलटण तालुक्यात ६१ टक्के पाऊस झालाअसला तरी कालवे असल्याने लोकांना टंचाईची फारसी समस्या उद्भवणारनाही. मात्र, काही भागात जनावरांचाचारा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसेच कोरेगाव तालुक्यात ३९६ मिलीमीटर पाऊस पडला असून, टक्केवारी ६६ इतकी आहे. कोरेगाव तालुक्यातही पाण्याचे संकट निर्माण होणार आहे. सध्या कोरेगाव तालुक्यात एका गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.पूर्व भागात अशी स्थिती असताना पश्चिमकडे सतत अडीच महिने पाऊस होता. त्यामुळे कोयनेसह धोम, उरमोडी, कण्हेर, बलकवडी, तारळी धरणे यावर्षी वेळेपूर्वी भरली. कोयनेतून सध्या सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत आहे. चिंतेची बाब म्हणजे कोयनेत सध्या ९४ टीएमसीपर्यंत साठा आहे. सातारा तालुक्यातही १०८ टक्के पाऊस झाला आहे. कºहाडमध्ये १०२, जावळी ९६, खंडाळा ९३, वाई तालुक्यात ७७ टक्के पाऊस आत्तापर्यंत झाला आहे. महाबळेश्वरमध्ये आतापर्यंत ५६९१ मिलीमीटर पाऊस झाला आहे.माण, खटाव तालुक्यांत पावसाअभावी खरीप हंगामातील उत्पादनात मोठी घट झाली आहे. अनेक गावांत तर पेरणीसाठी झालेलाखर्चही निघाला नाही. त्यातच आॅक्टोबरपासून दुष्काळाच्या झळा जाणवत असल्याने रब्बीच्या पेरणीचेसंकट कायम आहे. पूर्व भागात यंदा प्रथमच रब्बी हंगामातील क्षेत्रमोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. पिण्याला पाणी नाही तेथे पीकघेऊन काय फायदा या विवंचनेत शेतकरी आहेत.कोयनेला ५ तर नवजाला ६ हजार मिलीमीटरमाण, खटाव या दुष्काळी तालुक्यातील पावसाची वार्षिक सरासरी ४०० ते ४५० मिलीमीटर आहे. माण तालुक्यात यंदा निम्माच पाऊस झाला आहे. तर दुसरीकडे महाबळेश्वर येथे ५६९१, कोयनेला ५५०० तर सर्वाधिक नवजा येथे ६००० मिलीमीटर पाऊस झालेला आहे. पावसाची पूर्व आणि पश्चिम भागातील ही तफावत बरेच काही सांगून जाणारी आहे.खासगी टँकरसह ग्रामपंचायतीवर भरपाण्याअभावी अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना बंद पडल्या आहेत. त्यामुळे लोकांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. तर काही ठिकाणी खासगी टँकरमधून विकत पाणी घ्यावे लागत आहे. त्यासाठी लोकांना पैसे मोजावे लागत आहेत. तर काही ठिकाणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.