सातारा : गेल्या दीड-दोन महिन्यांपासून पावसानं पाठ फिरविल्यानं जिल्ह्याच्या पूर्व भागात पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. विहिरींनी तळ गाठलाय, तर ठिकठिकाणचे तलाव कोरडे पडू लागलेत. उन्हाच्या तडाख्यानं पिकं करपू लागली आहेत, काही ठिकाणी शेतजमीन भेगाळू लागलीय. भरपावसाळ्यातच दुष्काळानं असा खेळ मांडल्यानं बळीराजा पुरता हतबल झालाय. प्रशासनाने दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी आतापासून उपाययोजना आखायला हव्यात.आठ दिवसातून एक वेळ पाणी---सद्य:स्थितीत या भागातील देऊर, वाठार स्टेशन, विखळे, तडवळे, तळिये या गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. या गावांना आठवड्यातून एकवेळ पाणीपुरवठा होत असून ऐन पावसाळ्यातच पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. उन्हाळ्यात या गावांचा पाणीप्रश्न कसा सुटणार, हाच या भागाचा प्रश्न आहे.प्रस्ताव देऊन अपुरी टँकर व्यवस्थाकोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील अनेक गावांनी पाणीटंचाईबाबत ग्रामसभा घेऊन प्रशासनाकडे पाण्याचे टँकर सुरू करण्यासंदर्भात मागणी केली आहे. पाठपुरावा करूनही प्रशासनाने याकडे कानाडोळा करत दोन गावांत आठवड्यातून एक टँकर असे नियोजन केले आहे. त्यामुळे नागरिकांना खासगी टँकरकडून पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.मूर्ती विसर्जनाचा प्रश्नकाही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. या भागातील मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा केला जातो. मोठ्या मूर्ती येथील आकर्षण असतात. यंदा तलाव कोरडे पडू लागल्याने मोठ्या गणेशमूर्ती विसर्जन करण्याचा मोठा प्रश्न मंडळांपुढे आहे.
दुष्काळानं ठोठावलं जिल्ह्याचं पूर्वद्वार!
By admin | Published: August 30, 2015 9:57 PM