शहरं
Join us  
Trending Stories
1
मच्छिमार महामंडळासाठी ५० कोटी मंजूर, राज्य सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय, वाचा...
2
"इस्रायलला इशारा, अरब मुस्लिमांकडे मागितली साथ...; खामेनेईंच्या भाषणातील हे 10 मुद्दे आहेत खास
3
"'ते' एक वाक्य अन् तुम्ही माझ्या करिअरचं वाटोळं केलं"; पंकजा मुंडेंनी हसत हसत हातच जोडले
4
आजोबांनी नातीसाठी फुगा आणला पण तोच जीवावर बेतला; डॉक्टरांनी सांगितलं धक्कादायक कारण
5
चार महिन्यांपासून पाकिस्तानच्या खेळाडूंचा पगार रखडला; आता PCB ने केली सारवासारव
6
महायुती सरकारच्या काळात विधिमंडळ समित्याच नाहीत, 'मविआ'ने नेमल्या पण...; अहवालातून माहिती उघड
7
राजकीय पक्षांच्या मेळाव्याला पळण्यापेक्षा आपल्या हिताच्या मेळाव्यात या: मनोज जरांगे
8
“चारवेळा CM असताना शरद पवारांना आरक्षणाचा मुद्दा का आठवला नाही”; शिंदे गटातील नेत्याचा सवाल
9
INDW vs NZW : सलामीच्या सामन्यापूर्वी Team India ला सरप्राईज; स्मृती मानधनाच्या डोळ्यात पाणी
10
"हे खूपच गंभीर आणि लज्जास्पद", अमित शाह ड्रग्ज प्रकरणावरून काँग्रेसवर का भडकले?
11
काश्मिरात मोठा खेला? रिझल्टपूर्वीच NC-BJP सोबत येण्याची चर्चा; फारूक अब्दुल्ला कुणाला भेटले?
12
Ashish Shelar : "मुंबईच्या पाणी तुटवड्याला आदित्य ठाकरे जबाबदार"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
13
“जरांगेंच्या प्रकृतीची काळजी, आमचे सरकार आल्यास ५० टक्क्यांवर आरक्षण देऊ”: संजय राऊत
14
"जोरात झटका लागला, व्हिडिओ काढले...", गोळी कशी लागली?; गोविंदाने सांगितला संपूर्ण घटनाक्रम
15
टाटांनी 'या' कंपनीतून कमावला २३,०००% नफा; आता कमी केला हिस्सा, कोणती आहे कंपनी?
16
गजबच झालं! ठगांनी थेट खोटी बँकच सुरू केली, लाखो रुपये घेऊन लोकांना नोकरीही दिली, मग...
17
VINTAGE भज्जी! हरभजनने लगावला अफलातून सिक्सर; जाग्या झाल्या जुन्या आठवणी
18
टाटा, अदानी, महिंद्रा अन्... इस्रायल-इराण युद्धामुळे 'या' 10 भारतीय कंपन्यांचे मोठे नुकसान
19
"लोकांनी सिनेमा बघायला यावं म्हणून गौतमी पाटीलला...", अमेय वाघचा मोठा खुलासा, म्हणाला- "तिच्या शोला..."
20
तिरुपती लाडू वाद: “कोट्यवधी भाविकांच्या आस्थेचा विषय, स्वतंत्र SIT तपास करणार”; SCचे निर्देश

दुष्काळी भागातील ओढे, नाले तुडुंब

By admin | Published: October 02, 2016 12:48 AM

परतीच्या पावसाने झोडपले : खटाव, पाटण, फलटण तालुक्यांतही संततधार

सातारा : सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागासह बहुतांश ठिकाणी शनिवारी सायंकाळी परतीच्या पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे दुष्काळी माण, खटाव तालुक्यातील ओढे, नाले खळाळून वाहू लागले आहेत. या पावसामुळे शेतकऱ्यांसह अनेकांची त्रेधातिरपीड उडाली. साताऱ्यात शनिवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. सूर्यनारायणाचे दर्शन अधूनमधूनच होत होते. सायंकाळी चारनंतर पावसाला सुरुवात झाली. खंडाळा, शिरवळ, खटाव तालुक्यांतील पुसेगाव, फलटण, आदर्की, साखरवाडी परिसरात जोरदार पाऊस झाला. (प्रतिनिधी) खटावला शेतकऱ्यांची त्रेधातिरपीट खटाव : नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच माळेला पावसाने हजेरी लावल्याने नवरात्रोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली. तर खरीप पिकाच्या काढणीच्या लगबगीत असलेल्या शेतकऱ्यांना मात्र परतीच्या पावसाने मोठा झटका दिला आहे. खटावसह परिसरात शनिवारी झालेल्या परतीच्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. ओढे, नाले खळाळले कुकुडवाड : कायम दुष्काळी असणाऱ्या माण तालुक्यातील कुकुडवाड परिसरात घटस्थापनेच्या मुहूर्तावर शनिवारी दुपारी पावसाला सुरुवात झाली. कुकुडवाडसह परिसरात परतीच्या पावसाने झोडपून काढले. कुकुडवाड परिसरातील कुकुडवाडसह ढाकणी, दिवड, वडजल, पुकळेवाडी, समानेवाडी, मस्करवाडी, आगासवाडी, विरळी या परिसरात शनिवारी दमदार पाऊस झाला. पावसामुळे माळरानावरील छोटे नाले तसेच छोटी-मोठी डबकी भरून वाहू लागली आहेत. सुमारे तीन ते चार तास झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला होता. लोणंदलाही झोडपले लोणंद : लोणंदसह परिसरात शनिवारी सकाळपासून परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. एकीकडे दुर्गा मातेची घटस्थापना तर दुसरीकडे जोरदार पाऊस त्यामुळे अनेक मंडळांनी दुर्गादेवीच्या मूर्तीची उशिरा प्रतिष्ठापना केली. पावसामुळे लोणंद बसस्थानकामध्ये पाणी साचल्याने तळ्याचे स्वरूप आले आहे. या ठिकाणाहून चालताना प्रवाशांना कसरत करावी लागत आहे.