शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

सातारा जिल्ह्यातील आणखी १२ महसूल मंडलात दुष्काळ, राज्य शासनाचा निर्णय

By नितीन काळेल | Published: February 17, 2024 7:05 PM

शेतकऱ्यांना फायदा : पूर्वीच वाई अन् खंडाळा संपूर्ण तालुक्याबरोबर ६५ मंडले जाहीर 

सातारा : जिल्ह्यात गेल्यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने शासनाने वाई आणि खंडाळा संपूर्ण तालुका आणि त्यानंतर इतर तालुक्यांतील ६५ मंडलात दुष्काळ जाहीर करुन उपायोजनाचे आदेश दिले होते. त्यानंतर आता आणखी जिल्ह्यातील नवीन आणि पर्जन्यमापक न बसविलेल्या १२ मंडलात दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस पडतो. या पावसावरच खरीप आणि रब्बी हंगामाचे चित्र अवलंबून असते. गेल्यावर्षी मात्र, पर्जन्यमान कमी झाले होते. जून ते सप्टेंबर या चार पावसाळी महिन्यांचा विचार करता सरासरीच्या ७० टक्क्यांपेक्षा कमी पावसाची नोंद झालेली. प्रमुख धरणांत कमी पाणीसाठा होता. दुष्काळी भागात चारा आणि पाणीटंचाईचेही संकट होते. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांसह राजकीय पक्षाकडूनही मागणी होत होती. त्यातच कमी पर्जन्यमानामुळे राज्य शासनाने आॅक्टोबर महिन्यातच राज्यातील ४० तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले. यामध्ये सातारा जिल्ह्यातील वाई आणि खंडाळ्याचा समावेश होता. त्यानंतर दुष्काळी तालुक्यातून जोरदार टिकास्त्र सुरू झाले. कारण, माण, खटाव, फलटण, कोरेगाव हे तालुके पूर्वीपासून दुष्काळी आहेत. तालुक्यात पाण्यासाठी टॅंकर सुरू होते. चारा तसेच पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला. त्याचबरोबर लोकप्रतिनिधींनीही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी शासनाकडे केली होती. त्यानुसार नोव्हेंबर महिन्यात शासनाने महसूल मंडलात ७५ टक्क्यांपेक्षा कमी पर्जन्यमान झाले आहे. अशा राज्यातील १७८ तालुक्यांतील ९५९ महसूल मंडलात दुष्काळ जाहीर करण्यासाठी मान्यता दिलेली. यामध्ये सातारा जिल्ह्यातील आणखी ६५ मंडलांचा समावेश करण्यात आलेला.राज्य शासनाने आता १६ फेब्रुवारीला राज्यातील नवीन काही महसूल मंडलात दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर केली आहे. ज्या महसूल मंडलाचे विभाजन झाले. तसेच नवीन महसूल मंडल निर्माण झाले अशा ठिकाणी पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात आलेले नाही. त्याठिकाणी दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील १२ मंडलांचा समावेश झालेला आहे. सातारा तालुक्यातील करंजे तर्फ सातारा, कोडोली मंडल अंतर्भूत झाले आहे. तर कऱ्हाड तालुक्यातील येळगाव, पाटणमधील येराड, आवर्डे, मारुल हवेली. फलटणमधील कोळकी, खटाव तालुक्यातील कलेढोण, भोसरे तर माणमधील वरकुटे मलवडी, आंधळी आणि काेरेगावमधील साप मंडलाचा समावेश आहे. या ठिकाणी आता दुष्काळी सवलती लागू झालेल्या आहेत.

पूर्वी जाहीर ६५ महसूल मंडले..सातारा तालुका : सातारा, खेड, वर्ये, कण्हेर, शेंद्रे, नागठाणे, अंबवडे, वडूथ, तासगाव, अपशिंगे.जावळी : आनेवाडी, कुडाळ.पाटण : ढेबेवाडी, चाफळ, तारळे, मल्हारपेठ, तळमावले, कुठरे, मरळी.कऱ्हाड : कऱ्हाड, उंब्रज, इंदोली, सुपने, मसूर, कवठे, कोपर्डे हवेली, सैदापूर, शेणोली, कोळे, उंडाळे, काले, मलकापूर.कोरेगाव : कोरेगाव, कुमठे, रहिमतपूर, शिरंबे, वाठार स्टेशन, वाठार किरोली, पिंपोडे बुद्रुक, सातारारोड, किण्हई.खटाव : खटाव, आैंध, पुसेगाव, बुध, वडूज, पुसेसावळी, मायणी, निमसाेड, कातरखटाव.माण : दहिवडी, मलवडी, कुकुडवाड, म्हसवड, मार्डी, शिंगणापूर.फलटण : फलटण, आसू, होळ, गिरवी, आदर्की बुद्रुक, वाठार निंबाळकर, बरड, राजाळे, तरडगाव.

या सवलती मिळणार..

  • जमीन महसुलात सूट
  • सहकरी कर्जाचे पुनर्गठण
  • शेतीशी निगडीत कर्ज वसुलीस स्थगिती
  • कृषी पंपाच्या चालू विजबिलात ३३.५ टक्के सूट
  • शालेय, महाविद्यालयीन विद्याऱ्थी परीक्षा शुल्कात माफी
  • रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथीलता
  • आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टॅंकर
  • टंचाई जाहीर गावात शेती पंपाची वीजजोडणी खंडित न करणे
टॅग्स :Satara areaसातारा परिसरdroughtदुष्काळ