शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
2
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
3
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
4
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
5
प्रियांका गांधींनी गुंतवलेल्या Mutual Fund नं किती दिले रिटर्न? तुमच्यासाठी फायद्याचा सौदा आहे की नाही?
6
Laxmi Pujan 2024: लक्ष्मीपूजेत केरसुणीची पूजा केल्यावर लक्षात ठेवा 'हे' नियम; अन्यथा पूजा जाईल व्यर्थ!
7
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
8
IND vs NZ 3rd Test : न्यूझीलंडनं टॉस जिंकला, मॅच कोण जिंकणार?
9
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
11
अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती! घेतलं नवीन घर, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक
12
Laxmi Pujan Muhurta 2024: लक्ष्मीकुबेर पूजन कधी आणि कसं करावं? दाते पंचांगाने दिली सविस्तर माहिती!
13
५ वर्षांनी 'आई कुठे...' मालिका संपणार! मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले- "ठाण्यातील ज्या बंगल्यात शूट केलं तिथे..."
14
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
15
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
16
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
17
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
18
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
19
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
20
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल

सातारा जिल्ह्यातील आणखी ६५ मंडलात दुष्काळ; १४ मंडले निकषाबाहेर , वाई अन् खंडाळा तालुक्यांत पूर्वीच जाहीर

By नितीन काळेल | Published: November 11, 2023 1:17 PM

राज्य शासनाने काही दिवसांपूर्वी दुष्काळ तालुके जाहीर केले यामध्ये साताऱ्यातील वाई आणि खंडाळ्याचा समावेश केला.

नितीन काळेल 

सातारा : राज्य शासनाने काही दिवसांपूर्वी दुष्काळ तालुके जाहीर केले यामध्ये साताऱ्यातील वाई आणि खंडाळ्याचा समावेश केला. त्यानंतर आता महसूलमंडलनिहाय दुष्काळसदृश्य स्थिती जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार ७५ टक्क्यांपेक्षा कमी पर्जन्यमान झालेली सातारा जिल्ह्यात आणखी ६५ मंडले स्पष्ट झाली आहेत. याठिकाणी आता दुष्काळी सवलती लागू होणार आहेत. तर १४ मंडलांना वगळण्यात आलेले आहे.जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस पडतो. या पावसावरच खरीप आणि रब्बी हंगामाचे चित्र अवलंबून असतात. यावर्षी मात्र, पर्जन्यमान कमी झालेले आहे. जून ते सप्टेंबर या चार पावसाळी महिन्यांचा विचार करता सरासरीच्या ७० टक्क्यांपेक्षा कमी पावसाची नोंद झालेली आहे. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. प्रमुख धरणांत कमी पाणीसाठा आहे. दुष्काळी भागात चारा आणि पाणीटंचाईचेही संकट आहे. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांसह राजकीय पक्षाकडूनही मागणी होत होती. त्यातच कमी पर्जन्यमानामुळे राज्य शासनाने मागील महिन्यातच राज्यातील ४० तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले. यामध्ये सातारा जिल्ह्यातील वाई आणि खंडाळ्याचा समावेश होता.

यानंतर दुष्काळी तालुक्यातून जोरदार टिकास्त्र सुरू झाले. कारण, माण, खटाव, फलटण, कोरेगाव हे तालुके पूर्वीपासून दुष्काळी आहेत. आजही या तालुक्यात पाण्यासाठी टॅंकर सुरू आहेत. चारा तसेच पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यातच लोकप्रतिनिधींनीही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी शासनाकडे केली होती. त्यानुसार गुरुवारी शासनाने महसूल मंडलात ७५ टक्क्यांपेक्षा कमी पर्जन्यमान झाले आहे. अशा १७८ तालुक्यांतील ९५९ महसूल मंडलात दुष्काळ जाहीर करण्यासाठी मान्यता दिलेली आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील आणखी ६५ मंडलांचा समावेश आहे.

७५ टक्क्यांपेक्षा कमी पर्जन्यमान झालेली ६५ महसूल मंडले...

सातारा तालुका : सातारा, खेड, वर्ये, कण्हेर, शेंद्रे, नागठाणे, अंबवडे, वडूथ, तासगाव, अपशिंगे.जावळी : आनेवाडी, कुडाळ.

पाटण : ढेबेवाडी, चाफळ, तारळे, मल्हारपेठ, तळमावले, कुठरे, मरळी.कऱ्हाड : कऱ्हाड, उंब्रज, इंदोली, सुपने, मसूर, कवठे, कोपर्डे हवेली, सैदापूर, शेणोली, कोळे, उंडाळे, काले, मलकापूर.

कोरेगाव : कोरेगाव, कुमठे, रहिमतपूर, शिरंबे, वाठार स्टेशन, वाठार किरोली, पिंपोडे बुद्रुक, सातारारोड, किण्हई.खटाव : खटाव, आैंध, पुसेगाव, बुध, वडूज, पुसेसावळी, मायणी, निमसाेड, कातरखटाव.

माण : दहिवडी, मलवडी, कुकुडवाड, म्हसवड, मार्डी, शिंगणापूर.फलटण : फलटण, आसू, होळ, गिरवी, आदर्की बुद्रुक, वाठार निंबाळकर, बरड, राजाळे, तरडगाव.

शासन सवलती लागू; १४ मंडले बाहेर...

वाई आणि खंडाळा तालुके दुष्काळी जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे उर्वरित नऊ तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. याठिकाणी शासन निर्णयानुसार सवलती लागू होणार आहेत. तर दुष्काळ निकषात १४ मंडले बसत नाहीत ती अशी.सातारा तालुका : दहिवड, परळी

जावळी : मेढा, बामणोली, केळघर, करहरपाटण : पाटण, म्हावशी, हेळवाक, मोरगिरी

महाबळेश्वर : महाबळेश्वर, पाचगणी, तापोळा, लामज

टॅग्स :Satara areaसातारा परिसर