खटाव : कोरोनाची साखळी खटावमध्ये अधिकच वाढत आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून खटावमध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने ट्रॅक्टर ब्लोअरने सोडियम हायपोक्लोराइट या औषधाची फवारणी करण्यात आली. परिसर निर्जंतुक करण्यात येत आहे.
गावात हॉटस्पॉट बनू लागलेल्या परिसरासह संपूर्ण गावात प्रत्येक वॉर्डमधील मुख्य रस्त्यावर, गावातील अंतर्गत रस्ते, अडगळीचा परिसर, लोकवस्तीच्या ठिकाणी ही फवारणी केली. कोरोनाबधित असलेल्या घराशेजारी व परिसरातून ही फवारणी करण्यात येत आहे.
नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेत ग्रामपंचायतीच्या वतीने या उपाययोजना सुरू केल्या आहेत. नागरिकांनी मात्र घरातच राहून कोरोनाविरुद्धच्या या लढाईत सहकार्य करावे. विनाकारण घराबाहेर पडू नये, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही सरपंच नंदकुमार वायदंडे, उपसरपंच अमर देशमुख यांनी केले आहे.
फोटो नम्रता भोसले यांनी मेल केला आहे.
खटाव ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औषध फवारणीस सुरुवात केली आहे. (छाया : नम्रता भोसले)