या निर्जंतुकीकरण मोहिमेची सुरुवात सरपंच अॅड. पंडितराव हरदास, उपसरपंच अजित यादव यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी माजी उपसरपंच जयवंत यादव, संदीप साळुंखे, भाऊसाहेब यादव, राहुल यादव, बाळासाहेब जाविर, विजय जाधव, ग्रामसेवक एस. बी. थोरात, प्रशांत कुंभार, निवास यादव यांची उपस्थिती होती.
जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत आहे. जिल्हा प्रशासनाबरोबर आरोग्य विभागही यावर मात करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेचा स्ट्रेन अतिशय वेगाने फैलावत आहे. त्यामुळे प्रशासनाबरोबर स्थानिक प्रशासनही चिंतेत आहे. आपापल्या गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून ग्रामस्थ प्रयत्न करीत आहेत. याच पार्श्वभूमीवर संपूर्ण गाव निर्जंतुक करण्याची मोहीम राबविली जात आहे. यंत्राच्या साहाय्याने संपूर्ण गावात, गल्लीबोळांत पाईपने सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी करण्यात आली. संपूर्ण गावात जणू काही हायपोक्लोराईचा पाऊस पाडला. ग्रामपंचायतीच्या या कार्यक्रमामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.
फोटो : १९केआरडी०१
कॅप्शन : कालेटेक (ता. कऱ्हाड) ग्रामपंचायतीच्या वतीने गावात औषध फवारणी करण्यात आली.