शहरं
Join us  
Trending Stories
1
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
2
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
3
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
4
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
5
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर
6
देश सोडला, भारतात आली, ओळख लपवली...; एडल्ट स्टार बन्ना शेख कशी बनली रिया बर्डे?
7
'डॉली चायवाला'ची क्रेझ! भारताच्या हॉकी संघाकडे केलं दुर्लक्ष; खेळाडूंनी व्यक्त केली खदखद
8
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका
9
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
10
अत्याचारी राक्षस पुन्हा नको, यासाठी माझी लढाई; उमेश पाटील करणार NCP ला रामराम?
11
Musheer Khan Accident: टीम इंडियाचा क्रिकेटर सर्फराज खानचा भाऊ मुशीरचा अपघात
12
Solar Eclipse 2024: सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही पण परिणाम होतो हे नक्की; जाणून घ्या उपाय!
13
पितृपक्ष: चतुर्दशी श्राद्ध एवढे महत्त्वाचे का? केवळ ‘या’ पितरांचा करतात विधी; पाहा, मान्यता
14
काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी चकमक; 3 जवान जखमी, सर्च ऑपरेशन सुरू
15
Indira Ekadashi 2024: नोकरी व्यवसायात यशप्राप्तीसाठी आज इंदिरा एकादशीला करा 'हे' खास उपाय!
16
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
17
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
18
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
19
अदानींच्या झोळीत आली आणखी एक कंपनी; २०० कोटींना झाली डील, जाणून घ्या
20
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...

आचारसंहितेमुळे गादीवरील कार्यकर्ते आले सतरंजीवर

By admin | Published: October 19, 2016 10:44 PM

नेत्यांनी घेतली धास्ती : राजकीय गुफ्तगू आता खासगी जागेत--पालिका निवडणूक आचारसंहितेचा फलक

सातारा : राज्यातील नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू केली आहे. त्यामुळे शासकीय विश्रामगृह येथे बैठका, चर्चा व प्रवेश करण्यास राजकीय नेत्यांना मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे सातारा शासकीय विश्रामगृहात आचारसंहितेमुळे गादीवरील कार्यकर्ते सतरंजीवर आल्याचे चित्र दिसू लागले आहे. आचारसंहितेच्या पहिल्याच दिवशी कोणताही राजकीय नेता विश्रामगृहात फिरकला नाही. एवढी धास्ती आचारसंहितेची घेतली आहे. सातारा जिल्ह्यातील सातारा, कऱ्हाड, वाई, महाबळेश्वर, पाचगणी, रहिमतपूर, म्हसवड, फलटण नगरपालिका व पाटण, मेढा, दहिवडी, कोरेगाव, खंडाळा, वडूज या नगरपंचायती निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. आचारसंहितेमुळे नेहमीच शासकीय विश्रामगृह गजबलेले असते. खासदार, आमदार, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तसेच माजी पदाधिकारी यांच्यासह राजकीय पदाधिकाऱ्यांची नेहमीच वर्दळ असते. काहीजणांचे वाहन विश्रामगृहात आल्यानंतर त्वरित त्यांच्यासाठी विश्रामगृहातील कक्ष उघडण्यात येतो. शासकीय अधिकारीसुद्धा या विश्रामगृहाचा पुरेपूर लाभ घेतात; पण सध्या आचारसंहितेमुळे राजकीय पटलावरील अनेकांना आता चौकातील हॉटेल, टपरी व दुकानाचा आसरा घ्यावा लागत आहे. (प्रतिनिधी)विश्रामगृहात चिडीचूप शांतताया आचारसंहितेच्या कालावधीत राजकीय नेत्यांना सक्त मनाई करण्याचे फलक दर्शनी भागात लावण्यात आले आहेत. त्यामुळे आजपासूनच शासकीय विश्रामगृहात शुकशुकाट जाणवत आहे. फक्त शासकीय अधिकारी, अधिस्वीकृती पत्रकार व शासनमान्य अतिमहत्त्वाच्या व्यक्ती यांच्यासाठी हे विश्रामगृह उपलब्ध होणार आहे, अशी माहिती मिळाली आहे.