मसूर : मसूर येथील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी मसूर हे गांव दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करा, अशी मागणी केली होती. या मागणीला ‘लोकमत’ने चांगल्या प्रकारे प्रसिध्दी दिल्याने आमचे गांव दुष्काळग्रस्त म्हणून शासनाने जाहीर केले. त्याबद्दल येथील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी बैठक आयोजीत करून शासनाचे व ‘लोकमत’चे जाहीर आभार मानले १९७२ पेक्षाही दुष्काळाच्या तिव्रतेने मसूर भाग होरपळत आहे. या दुष्काळात खरीप पिके पूर्णत : वाया गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शेतीच्या पाण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. अशा भयावह स्थितीत मसूर भाग दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांंना नुकसान भरपाई द्यावी,तसेच ५० पैसे पेक्षा कमी पैसेवारी रितसर महसूल विभागाने दाखवावी.प्राप्त दुष्काळ स्थितीत जर चुकीची पैसेवारी शासनाला दाखवून या भागाची क्रुर चेष्ठा केल्यास संतप्त शेतकरी व ग्रामस्थ रास्ता रोको करतील असा देण्यात आला होता. याबाबत लोकमतने सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे मसूर येथील शेतकऱ्यांना न्याय मिळाला असेही नागरिकांनी मत व्यक्त केले. यावेळी राष्ट्रीय काँगे्रसचे जिल्हा सरचिटणीस नंदकुमार जगदाळे, सह्याद्री कारखान्याचे संचालक लहुराज जाधव, प्रा. कादर पिरजादे, नरेश माने, सरपंच रेखा वायदंडे, उपसरपंच शांताराम मोरे, शिवसेना उपतालुकाप्रमुख तात्यासो घाडगे, सतीश पाटील, श्रीकांत जिरंगे, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन नाथाजी पाटील किशोर जगदाळे, नितीन जगदाळे, दत्तात्रय जगदाळे, राजेंद्र घाडगे, एन.के.पाटील, राजेंद्र बर्गे, बंडा जगदाळे, मनिषा जगदाळे, आशा कदम, आण्णा जाधव आदी प्रमुख कार्यकर्त्यांसह शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. प्रा. कादर पिरजादे यांनी आभार मानले. (वार्ताहर)
मसूर दुष्काळग्रस्त जाहीर झाल्याने ग्रामस्थांना दिलासा
By admin | Published: October 20, 2015 9:37 PM