पसरणी : वाई तालुक्यातील बदलत्या हवामानामुळे स्ट्रॉबेरीसह भाजीपाला यावर पडणाऱ्या करपा, तांबेरा, पांढरी भुरीमुळे शेतकरी हैराण झाला आहे. स्ट्रॉबेरीसह भाजीपाला वाचविण्याचे आव्हानच रोगांनी दिल्याने शेतकऱ्यांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.वाईच्या पश्चिम भागात गोळेवाडी, गोळेगावसह कोंडवली या गावांमधून स्ट्रॉबेरीसह भाजीपाला मोठ्या प्रमाणात घेतला जातो. पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी झाल्याने रोगराईचा बिमोड हवा तसा झालेला नाही, त्यातच वारंवार बदल होत असल्याने हवामानामुळे सध्या या भागातील स्ट्रॉबेरीसह कारले, तोडका, कोबी, वांगी, फ्लॉवर, टोमॅटो या पिकांवर तांबेरा, पांढरी भुरी, करपा, दावण्या, स्पॉट या रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने पिकाच्या उत्पन्नावर विपरित परिणाम झालेला आहे.
स्ट्रॉबेरीसह पालेभाज्यांवर रोगांचा प्रादुर्भाव, उत्पन्नावर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 13:27 IST
पसरणी : वाई तालुक्यातील बदलत्या हवामानामुळे स्ट्रॉबेरीसह भाजीपाला यावर पडणाऱ्या करपा, तांबेरा, पांढरी भुरीमुळे शेतकरी हैराण झाला आहे. स्ट्रॉबेरीसह ...
स्ट्रॉबेरीसह पालेभाज्यांवर रोगांचा प्रादुर्भाव, उत्पन्नावर परिणाम
ठळक मुद्देस्ट्रॉबेरीसह पालेभाज्यांवर रोगांचा प्रादुर्भाव, उत्पन्नावर परिणामवाई तालुक्यात करपा, तांबेरा, पांढरी भुरीमुळे शेतकरी हैराण