कोरेगाव : ‘शहराला विकासकामांद्वारे नवी ओळख मिळवून देण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. जनतेसह नगरसेवकांमध्ये कसलाही दुजाभाव न ठेवता सर्वांना बरोबर घेत विकासाचा वेग मोठ्या प्रमाणात वाढवला आहे,’ असे प्रतिपादन नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांनी केले.प्रभाग क्र. ११ व १३ मधील केदारेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण, प्रभाग क्र. ४ मधील एकंबे रस्त्यानजीकच्या कॉलनीतील रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरण व प्रभाग क्र. ५ व ६ मधील शांतीनगर गॅस आॅफिस रस्त्याचे डांबरीकरणाचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी बर्गे बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष जयवंत पवार, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संजय पिसाळ, विरोधी पक्षनेते महेश बर्गे, नगरसेवक बच्चुशेठ ओसवाल, नागेश कांबळे, नगरसेविका साक्षी बर्गे, पूनम मेरुकर यांची प्रमुख उपस्थिती होती.बर्गे पुढे म्हणाले, ‘विकासकामे करत असताना नागरिकांच्या सूचना व नगरसेवकांनी सूचविलेल्या कामांना प्राधान्य देण्यात येत आहे. सर्वांना समान न्याय देण्याची भूमिका ठेवली आहे. शहरातील सर्व प्रभाग विकासाच्या प्रवाहात आणून या शहराला एक नवी ओळख देण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्यासाठी मोठ्या प्रमाणात विकासकामे हाती घेतली असून, निधीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध केला जात आहे. सर्वांच्या बरोबरीने शहराच्या विकासाचा वेग वाढता ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.जयवंत पवार म्हणाले, ‘पदाधिकारी, नगरसेवकांबरोबरच कर्मचाºयांचेही योगदान मोठे असून, सर्वांच्यात एकीची भावना निर्माण करण्याचे काम नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांनी केले आहे.शहरात विकासकामे हाती घेतल्यामुळे नागरिकांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. ऐन उन्हाळ्यातसुद्धा सुरळीत पाणी पुरवठा करण्यात नगरपंचायत यशस्वी झाली आहे.’संतोष नलावडे यांनी प्रास्ताविक केले. प्रकाश चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. बापूसाहेब जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रमास डॉ. संजय क्षीरसागर, डॉ. राजन काळोखे, साहेबराव बर्गे, जगन्नाथ बर्गे, अॅड. एकनाथ शिंदे, यज्ञेश्वर मांढरे, नवनाथ बर्गे, सुनील बर्गे, राहुल बर्गे, संतोष कोकरे, दीपक फडतरे, महादेव जाधव, गणेश येवले, अमोल मेरुकर, मुस्ताक खान यांच्यासह नागरिक उपस्थित होते.कोरेगाव येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी राजाभाऊ बर्गे, जयवंत पवार, संजय पिसाळ, बच्चूशेठ ओसवाल, महेश बर्गे, सुनील बर्गे, नवनाथ बर्गे आदी उपस्थित होते.
विकासात दुजाभाव न ठेवल्यामुळेच कामे मार्गी : राजाभाऊ बर्गे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2018 12:43 AM
कोरेगाव : ‘शहराला विकासकामांद्वारे नवी ओळख मिळवून देण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत.
ठळक मुद्देकोरेगावात विविध विकासकामांचे उद्घाटन; डांबरीकरण अन् खडीकरणाला प्राधान्य