शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

नियोजनाअभावी अपघातांत वाढ!

By admin | Published: June 26, 2015 11:25 PM

दोन वर्षांचा अनुभव : अरुंद रस्त्यांमुळे फलटण तालुक्यात घडताहेत प्रकार--पंढरीची वाट लई अवघड :५

नीलेश सोनवलकर -दुधेबावी -श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी फलटण तालुक्यात आल्यानंतर जिल्ह्यातील अनेक दिंड्या सहभागी होत असतात. तसेच अनेक वारकरी दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे अरुंद रस्त्यावर ताण येत आहे. त्यातून अपघातांच्या घटनांना निमंत्रण मिळत आहे. यासाठी पोलिसांनी योग्य नियोजन करण्याची गरज आहे.सातारा जिल्ह्यातील श्री क्षेत्र शिंगणापूर, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, श्री क्षेत्र भिवाई कांबळेश्वर, श्री क्षेत्र धुळोबा धुळदेव येथील पालख्या सहभागी होत असतात. पालख्या, वारकरी रस्त्याने चाललेले असतात. त्याचवेळी अनेक वाहने भरधावपणे जात असतात. पालखीचा फलटणनंतरचा मुक्काम बरड येथे असल्याने परिसरातील शेकडो भाविक येतात. बरडला दोन दिवसांचा मुक्काम असल्याने पुणे-पंढरपूर मार्गावर वाहनांची मोठी गर्दी असते. त्या काळात दोन दिवस वाहतूक वळविणे गरजेचे असते. दोन दिवसांच्या कालावधीत पोलिसांना योग्य अंतरावर थांबवून वाहतुकीची व्यवस्थापन करण्याची गरज आहे. पावसामुळे पालखी मार्गावरील रस्त्याच्या साईडपट्ट्या खचत असतात. अवजड वाहन गेल्याने खड्डे पडल्याने त्या भरून घ्याव्यात, म्हणजे कसरत करावी लागणार नाही. तसेच काटेरी झुडपांमुळे वाहने दिसत नाहीत. त्यामुळे झुडपे काढल्यास नक्कीच अपघात टाळता येतील.आपत्कालीन यंत्रणा हवीय सावध...लोणंदजवळ दोन वर्षांपूर्वी भीषण अपघात झाला होता. त्यावेळी चांगली आरोग्य सेवा पुरविली होती. त्याचप्रमाणे फलटण तालुक्यात भविष्यात कधी अनावधनाने अपघात झालेच तर तातडीने आरोग्य सुविधा देण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित करावी.