शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
2
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
3
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
4
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
5
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
6
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
7
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
8
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
9
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
10
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
11
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
12
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
13
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
14
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
15
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
16
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
17
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
18
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
19
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
20
Gold-Silver Rates Today : लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट

नियोजन नसल्याने कृषी अर्थव्यवस्था कोलमडली

By admin | Published: September 06, 2016 1:35 AM

पृथ्वीराज चव्हाण : कऱ्हाड तालुक्यात नवीन दोनशे शाळा खोल्या

कऱ्हाड : ‘विकासाचे अनेक कार्यक्रम सध्याच्या सरकारने बदलून टाकले आहेत. यातून आपला विकास सोडून विदर्भाचा विकास साधण्याचा सरकारचा हट्ट सुरू आहे. विदर्भाचा विकास झाला म्हणून आम्हाला वाईट वाटत नाही. परंतु त्यापोटी पश्चिम महाराष्ट्राचा विकास थांबवणे चुकीचे आहे. सरकारकडे नियोजन नसल्याने कृषी अर्थव्यवस्था कोलमडली आहे,’ असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. काले, ता. कऱ्हाड येथे जनविकास यौद्धा प्रतिष्ठान व पैलवान नानासाहेब पाटील मित्र परिवाराच्या वतीने गावामध्ये सुमारे पन्नास कडबाकुट्टी मशीनच्या वितरणप्रसंगी ते बोलत होते. माजी पोलिस पाटील शामराव पाटील अध्यक्षस्थानी होते. जिल्हा बँकेचे संचालक व जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेश पाटील-वाठारकर, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते जयवंतराव जगताप, बाजार समितीचे संचालक सुनील पाटील, इंद्रजित चव्हाण, सर्जेराव शिंदे, कृष्णत थोरात, अ‍ॅड. ए. वाय. पाटील, अ‍ॅड. नरेंद्र नांगरे-पाटील, पंचायत समिती सदस्य राजेंद्र बामणे, कऱ्हाड दक्षिण काँग्रेसचे संघटक उदय पाटील-उंडाळकर, प्रवक्ते पै. तानाजी चवरे, सेवादलाचे अध्यक्ष शिवाजीराव मोहिते, नितीन थोरात, सचिन काकडे, रणजित देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार चव्हाण म्हणाले, ‘काले हे गाव स्वावलंबी आहे; पण सोयी-सुविधांचा अभाव असल्याने त्या उभ्या करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येण्याची गरज आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात समाविष्ट झालेली कामे परत जात नाहीत याची प्रचिती तुम्हाला आली आहे. तालुक्यातील मंजूर विकास कामांबाबत सुरुवातीला गैरसमज पसरवला गेला. परंतु ती कामे हळूहळू सुरू झाली आहेत. आमच्या सरकारच्या काळातील अनेक योजना नवीन सरकारने बंद केल्या आहेत. सर्व शिक्षा अभियान हा कार्यक्रमही त्यांनी इतरत्र विलीन केला आहे. काले ते नारायणवाडी रस्त्याचे कामही सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे अडकून पडले आह; पण त्या रस्त्याचे काम पूर्ण करणारच. तालुक्यातील १८३ धोकादायक शाळा खोल्यांचा प्रस्ताव पाठवून याबाबत नवीन खोल्या मिळाव्यात म्हणून माझा पाठपुरावा सुरू आहे. खूप पाठपुरावा केल्यामुळे जिल्ह्यात दोनशे शाळा खोल्या मंजूर झाल्या आहेत. शेतीत यांत्रिकीकरण केले पाहिजे. तंत्रज्ञानयुक्त अचूक शेती केल्यास पुढील दहा ते वीस वर्षे शाश्वत उत्पन्न शेतकरी घेऊ शकणार आहे. यांत्रिकीकरणामुळे शेतीवरील रोजगाराचा भार कमी होईल.’ यावेळी पै. नानासाहेब पाटील यांचेही यावेळी भाषण झाले. आमदार चव्हाण यांच्या हस्ते विलास यादव, आनंदा देसाई, संदीप यादव, नंदकुमार मोहिते, विठ्ठल यादव, संदीप यादव, कृष्णत यादव, बापूसाहेब पाटील व श्रीमंत काकडे यांना कडबाकुट्टी मशीनचे वाटप करण्यात आले. तानाजी चवरे यांनी सूत्रसंचालन केले. दिलीप पाटील यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)