जावेद खान।सातारा : ग्रामीण भागातून शहरात स्थलांतरित झालेली मंडळी खऱ्याखुºया बैलांऐवजी मातीच्या मूर्ती पूजण्यात धन्य मानू लागली आहेत, यामुळे शहरात या बेंदुराच्या पार्श्वभूमीवर मातीच्या मूर्तींची मागणी वाढत चालल्याची माहिती शहरातील कुंभार वर्गाने ‘लोकमत’ला दिली.
दरम्यान, पावसाळी वातावरणात बैल वाळण्याला अधिक कालावधी लागत असल्याने कुंभार वर्ग मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासूनच बैल बनविण्यास सुरुवात करत असल्याने यंदाही बाजारात वेळेत मातीची बैले उपलब्ध होणार असल्याचे कुंभार वर्गातून सांगण्यात आले आहे.
पुढील महिन्यात बळीराजाचा जिव्हाळ्याचा सण म्हणजे बेंदूर. संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ग्रामीण भागात व शहरी भागात हा सण साजरा केला जातो. ग्रामीण भागात शेतकरी बैलांची पूजा करतात. तर शहरी भागात सहसा बैल पाहायला मिळत नसल्याने शाडू मातीच्या बैल जोडीची पूजा करतात.सध्या शहरामध्ये बैलाचे रंगकाम कुंभारवाड्यामध्ये सुरु करण्यात आले आहे. बैलांवर शेवटचा रंगाचा हात मारण्यामध्ये कुंभारदादा मग्न झाले आहेत.प्लास्टिक आॅफ पॅरिसच्या बैलांना मागणीग्रामीण भागातील चाकरमानी शहराकडे वळत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातला हा सण साजरा करण्यासाठी जिवंत बैलांची पूजा करतात. मात्र, शहरातील चाकरमानी ही प्लास्टिक आॅफ पॅरिसच्या बैलांची पूजा करतात. त्यामुळे शहरात प्लास्टिक आॅफ परिसच्या बैलांची मागणी जास्त प्रमाणात होत आहे.
सण झाला की शोसाठी वापरमहाराष्ट्रीय बेंदूर पुढील महिन्यात असला तरी कर्नाटक बेंदराच्या सणाची लगबग महाराष्ट्रातही सुरू झाली आहे. या काळात मातीच्या बैलांची पूजा करतात. त्यानंतर त्याचे काय होते. तो मातीचा बैल शोकेसमध्ये किंवा टीव्हीवर शोसाठी ठेवला जाता. तर लहान मुले त्याचा वापर खेळण्यासाठी करतात.सध्या मातीबरोबर प्लास्टिक आॅफ पॅरिसचेही बैलं बाजारात उपलब्ध होत आहेत.प्लास्टिक आॅफ पॅरिसच्या बैलांना शहरात जास्त मागणीजिवंत बैलांची संख्या कमी ग्रामणी भागात जिवंत बैलांची मिरवणूक व शहरात प्लास्टिक आॅफ पॅरिसच्या बैलांची पूजा
महाराष्ट्र बेंदूर पुढील महिन्यात आहे. माक्ष कर्नाटकी बेंदूर जवळ आला आहे. त्यामुळे बैल करण्यास आतापासून सुरुवात केली. हा सण पावसाळ्यात येत असल्याने वातावरणात गारवा असतो. त्यामुळे शाडू मातीची बैले वेळेत वाळत नाही. यासाठी या सणाची तयारी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासूनच करावी लागते.- पोपट कुंभार, सातारा