परळी/ सातारा : परळी येथील घाटात दोन-तीन ठिकाणी मातीचा भराव आल्याने वाहतूक करण्यास अडचण येत होती त्यामुळे केळवली येथील हनुमान युवा मंडळाने श्रमदानातून तुटलेल्या रस्त्यात भराव टाकून थोडी नालेसफाई केली
परळी खोरे हा अतिवृष्टीचा भाग म्हणून ओळखला जातो मान्सूनने जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनने दमदार हजेरी केली होती परंतु गेल्या पंधरा दिवसांपासून दडी मारलेल्या मान्सूनने पुन्हा एकदा परळी खोऱ्यात पुन्हा आगमन केल्याने नदी नाले ओढे खळखळून वाहू लागले आहेत. त्यातच घाट रस्त्यामधील दरडी पडण्याच्या सत्रास देखील सुरुवात झाली आहे.
परळी ते केळवली हा रस्ता ग्रामसडक योजनेतून तयार करण्यात आला आहे. परंतु ह्या वर्षी नालेसफाई न झाल्याने डोंगरावरून आलेला मातीचा भराव हा रस्त्यावर येऊन वाहतूक ठप्प होत आहे तसेच घाटातील असल्याने वाहतूक धोकादायक ठरत आहे.
कातवडी ते केळवली हा रस्ता घाटमार्गे असून दोन ठिकाणी रस्ता पूर्णपणे तुटला असून जागोजागी पाणी हे रस्त्यात येत आहे काही ठिकाणी पाणी वाहून रस्त्यालगतची माती वाहून गेल्याने रस्ता धोकादायक स्थितीत आला आहे.श्रमदानातून केला रस्ता केला खुलापरळी ते केळवली हा रस्ता गेली कित्येक वर्षापासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. त्यातच यावर्षी नालेसफाई न झाल्याने बहुतांश ठिकाणी डोंगरावरून आले मातीचे लोट हे रस्त्यावर येत आहेत.
येथील घाटात दोन-तीन ठिकाणी मातीचा भराव आल्याने वाहतूक करण्यास अडचण येत होती त्यामुळे केळवली येथील हनुमान युवा मंडळाने श्रमदानातून तुटलेल्या रस्त्यात भराव टाकून थोडी नालेसफाई केली