पुसेगाव : ‘श्री सेवागिरी महाराजांच्या ६९ व्या पुण्यस्मरणानिमित्त व नारायणगिरी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त पुसेगाव, ता. खटाव येथे मंगळवार, दि. २७ रोजी दुपारी २ वाजता निकाली कुस्त्यांचा जंगी आखाडा भरविण्यात येणार आहे,’ अशी माहिती देवस्थानट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी दिली.या कुस्ती स्पर्धेसाठी खासबाग कोल्हापूर व कुंडलच्या मैदानाच्या धर्तीवर देवस्थान ट्रस्टने गतवर्षी ८० फूट व्यासाचा कुस्ती आखाडा तयार केला आहे. दिल्ली, हरियाणा, पंजाब व महाराष्ट्रातील नामांकित मल्ल या मैदानात उतरणार आहेत. १०० रुपयांपासून १ लाख ५१ हजार रुपये इनामाच्या कुस्त्या लावण्यात येणार आहेत. त्यामुळे यंदाच्या यात्रेत कुस्त्यांची रंगत वाढणार असून, हजारो कुस्ती शौकिनांना नेत्रदीपक व चटकदार कुस्त्यांचा मनमुराद आस्वाद घेता येणार आहे.मठाधिपती सुंदरगिरी महाराज, ट्रस्ट अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त मोहनराव जाधव, उपसरपंच रणधीर जाधव, योगेश देशमुख, प्रताप जाधव, सुरेश जाधव, कुस्ती कमिटी सदस्य व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत दुपारी १ वाजता कुस्त्यांचा इनाम श्री सेवागिरी मंदिरातून वाजत गाजत आखाड्यात नेण्यात येणार आहे.आखाड्यातील माती बदलून लाल माती मोठ्या प्रमाणात भरण्यात आली आहे. मैदानाभोवती डबर टाकून बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. प्रेक्षक गॅलरीत कोणत्याही ठिकाणी बसून व्यवस्थितरीत्या कुस्ती पाहता येणार आहे. मैदानात उत्कृष्ट ध्वनी व्यवस्था व प्रकाश व्यवस्था करण्यात येणार आहे. रुपये १०० ते ५०० बक्षिसापर्यंतच्या पैलवानांनी आपल्या जोड्या सकाळी ९ ते १२ यावेळेत कुस्ती आखाड्यात नोंद कराव्यात, असे आवाहन अध्यक्ष डॉ. जाधव यांनी केले आहे.आखाड्यात प्रमुख पंच म्हणून पै. कृष्णात जाधव (मेजर), पै. सुभाष माने, पै. मोहन जाधव (तात्या), पै. हणमंतराव गायकवाड (सेनादल कुस्ती कोच, दिल्ली), पै. ननावरे, पै. विकास जाधव, पै. श्रीमंत जाधव-आण्णा, पै. नितीन राजगे, पै. राजेंद्र कणसे, पै. मधुकर शिंदे जांब, पै. अधिक जाधव व पै. तानाजी मांडवे हे काम पाहणार आहेत. शंकर पुजारी (सर) कोथळीकर या कुस्ती आखाड्याचे निवेदन करणार असून, त्यांना राजू आवळे, नगरसेवक कुंदवाड यांची हलगीची साथ लाभणार आहे.दरम्यान, पुसेगाव येथे भरविण्यात आलेल्या व्हॉलीबॉल स्पर्धेला खेळाडूंसह प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून या स्पर्धा पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने हजेरी लावत आहते. (वार्ताहर)यांच्यात रंगणार सामनाया आखाड्यात आंतरराष्ट्रीय कुस्ती केंद्र आंबेगाव-पुणे येथील पै. काका पवार यांचा पठ्ठा गोकूळ आवारे व मोतिबाग तालिम कोल्हापूरचा अमोल फडतरे, पंचगंगा तालिम कोल्हापूरचा माउली जमदाडे विरुद्ध जितेंद्रकुमार (दिल्ली), आंतरराष्ट्रीय कुस्ती केंद्र पुणेचा पोपट घोडके विरुद्ध मोतिबाग तालिम कोल्हापूरचा पै. मारुती जाधव, कौतुक डाफळे विरुद्ध भारत मदने, संदीप संपकाळ विरुद्ध महेश वरूटे, कार्तिक काटे विरुद्ध विजय धुमाळ, लखन पांढरे विरुद्ध संतोष लवटे, रामदास पवार विरुद्ध आप्पा जगताप, प्रशांत शिंदे विरुद्ध जयपाल वाघमोडे यांच्यातील रोमहर्षक लढती होणार आहे.+कृषी प्रदर्शनाचे आज औपचारिक उद्घाटनपुसेगाव : ‘श्री सेवागिरी महाराजांच्या ६९ व्या पुण्यस्मरणानिमित्त पुसेगाव येथे राज्यस्तरीय सेवागिरी कृषी व पशुपक्षी प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून, मंगळवार, दि. २७ रोजी या प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन होणार आहे,’ अशी माहिती मठाधिपती सुंंदरगिरी महाराज, ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव व स्मार्ट एक्स्पोचे संचालक सोमनाथ शेटे यांनी दिली.या कृषी, पशुपक्षी प्रदर्शनाची तयारी पूर्ण झाली असून, यावर्षी प्रथमच विनाखांब डोमशेप शामियानात हे प्रर्दशन भरणार आहे. यंदाच्या प्रदर्शनात आधुनिक, कोरडवाहू, ठिबक, पॉलिहाउस शेती, नामांकित कंपन्या, कृषी विद्यापीठे , शासकीय योजनांची माहिती स्टॉल व यंत्र सामुग्रीसह विविध ३०० स्टॉल सहभागी होणार आहेत. प्रदर्शनाचे मंगळवारी सकाळी १० वाजता मठाधिपती सुंदरगिरी महाराज यांच्या हस्ते व अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, सर्व विश्वस्त तसेच प्रगतशील शेतकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत औपचारिक उद्घाटन होणार आहे.विनाखांब डोमशेप शामियान्यात उभारण्यात येणाऱ्या या कृषी प्रदर्शनाची जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उत्सुकता लागून लागली आहे.
‘आऊट’ दिल्यामुळे एकास मारहाण
By admin | Published: December 26, 2016 11:43 PM