शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
2
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
3
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
4
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
5
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
7
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
8
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
9
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
10
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
11
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
12
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
13
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
14
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
15
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
16
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
17
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
18
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
19
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
20
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."

दिवाळीच्या सलग सुट्यांमुळे महाबळेश्वर गुलाबी थंडीत पर्यटकांनी बहरले!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2024 5:11 PM

महाबळेश्वर : दिवाळीतील सलग सुट्ट्यांमुळे महाबळेश्वर पर्यटकांनी बहरले आहे. वेण्णालेक नौकाविहारसह प्रेक्षणीय स्थळावर हिरवागार निसर्ग, सूर्यास्त व सूर्योदयाचे विहंगम ...

महाबळेश्वर : दिवाळीतील सलग सुट्ट्यांमुळे महाबळेश्वर पर्यटकांनी बहरले आहे. वेण्णालेक नौकाविहारसह प्रेक्षणीय स्थळावर हिरवागार निसर्ग, सूर्यास्त व सूर्योदयाचे विहंगम दृश्य अनुभवण्यासाठी पर्यटकांची चांगलीच गर्दी होताना दिसत आहे. महाबळेश्वरची गुलाबी थंडी, मनमोहित करणारे निसर्गसौंदर्य अन् स्ट्रॉबेरीची चव चाखताना पर्यटक पाहावयास मिळत आहेत.महाबळेश्वरमध्ये दिवाळी हंगाम सुरू असल्याने पर्यटकांच्या स्वागतासाठी हॉटेलसह दुकानदार सज्ज झाले आहेत. देश-विदेशातील पर्यटकांची रेलचेल या निसर्गरम्य पर्यटनस्थळी वाढली आहे. दिवाळी व उन्हाळी हंगामात पर्यटकांची संख्या लक्षणीय असते. दिवाळीची सुटी सुरू झाल्याने या थंड हवेच्या पर्यटनस्थळी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. पर्यटक हिरवाईने नटलेला निसर्ग अनुभवत असतानाच पर्यटक गुलाबी थंडीची मजा लुटत आहेत.केट्स पॉइंट, ऑर्थरसीट पॉइंट, श्रीक्षेत्र महाबळेश्वर मंदिर, ऐतिहासिक किल्ले प्रतापगड, लॉडवीक पॉइंट सूर्योदयासाठीचा प्रसिद्ध विल्सन पॉइंट, सूर्यास्तासाठीचा प्रसिद्ध मुंबई पॉइंटसह पर्यटकांच्या आकर्षणाचे ठिकाण लिंगमळा धबधबा ही पर्यटकांच्या पसंतीची ठिकाणे असलेली ही पर्यटनस्थळे गर्दीने गजबजून गेली आहेत.नौकाविहाराचा आनंदमहाबळेश्वरचे मुख्य आकर्षणाचे ठिकाण, नौकाविहारासाठी प्रसिद्ध वेण्णालेक येथे नौकाविहारासाठी पर्यटकांच्या रांगा लागल्या आहेत. पर्यटक नौकाविहार करताना पाहावयास मिळत आहेत, तर हौशी पर्यटक वेण्णालेकवर घोडेसवारीचा आनंद लुटताना दिसत आहेत. वेण्णालेकवर बच्चे कंपनीसाठी गेम्सची धूम वेण्णालेकवर सुरू आहे. जणू ‘जत्रे’चाच माहोल आहे. खवय्यांसाठी स्ट्रॉबेरीपासून बनविलेले विविध खाद्यपदार्थ, गरमागरम मका कणीस, फ्रँकी, पॅटिस, पाणीपुरी, भेळ, पावभाजी अशा पदार्थांवर ताव मारताना पर्यटक पाहावयास मिळत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानtourismपर्यटनDiwaliदिवाळी 2024