शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

सातारा जिल्ह्यात दुष्काळामुळे भीषण स्थिती, नागरिकांची पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती

By नितीन काळेल | Published: May 20, 2024 7:25 PM

तीन लाख लोकांची तडफड; दोन लाख जनावरांचा हंबरडा

सातारा : जिल्ह्यात दुष्काळामुळे भीषण स्थिती निर्माण झाली असून, सव्वा तीन लाख लोकांची पाण्यासाठी तडफड सुरू आहे. त्यामुळे घोटभर पाण्यासाठीही दाहीदिशा भटकंती सुरू आहे. तसेच चारा आणि पाणीही वेळेत मिळत नसल्याने दोन लाख जनावरांचा हंबरडा सुरू आहे. माळरानेही काळवंडली आहेत. त्यामुळे चाऱ्याच्या शोधात शेतकरीही भटकू लागलाय.जिल्ह्यात दर चार - पाच वर्षांनी दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. २०१८ साली जिल्ह्यात दुष्काळाचे भीषण संकट होते. त्यावेळी अनेक गावांत जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या. त्यामुळे हजारो पशुधन छावण्यात होते. त्याचठिकाणी शेतकऱ्यांनीही संसार थाटलेला. त्यानंतर आता दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे.मागील वर्षी जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ६५ टक्के पाऊस पडला. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पाऊस कमी राहिला. त्यामुळे गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यापासूनच दुष्काळी परिस्थिती आहे. राज्य शासनाने वाई, खंडाळा या संपूर्ण तालुक्याबरोबरच इतर ६०हून अधिक महसूल मंडळात दुष्काळ जाहीर केला आहे. पण, दुष्काळाच्या सवलती किती प्रमाणात लागू झाल्या याविषयी आजही शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे. सध्या तर जिल्ह्यात पाणी आणि चाऱ्याचा मोठा गहन प्रश्न आहे. त्यात दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे.

जिल्ह्यातील माण आणि खटाव तालुक्यात दुष्काळाची दाहकता अधिक आहे. माणमध्ये १०५ गावे आहेत. त्यातील ७१ गावे आणि ४३७ वाड्यावस्त्यांवर टंचाईच्या झळा आहेत. या गावातील १ लाख २४ हजार ६२३ लोकांना टँकरच्या पाण्याचा आधार आहे. १ लाख १९ हजार ७१५ पशुधनही टँकरवर अवलंबून आहे. माण तालुक्यात सध्या ८५ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. खटाव तालुक्यातही टंचाईची भीषणता वाढली आहे. ५२ गावे आणि १४५ वाडीवस्त्यांवर टँकरची चाके फिरू लागली आहेत. ३९ टँकरने ८१ हजार ३८४ नागरिकांना आणि १९ हजार ६४२ जनावरांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. फलटण तालुक्यातही दुष्काळाची चिंता आहे. सध्या ४० गावे आणि ९९ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. या टँकरवर सुमारे ६४ हजार नागरिक आणि ३७ हजारांवर पशुधनाची तहान अवलंबून आहे.कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात टंचाईच्या झळा वाढल्या आहेत. या भागातील ३३ गावात पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यात सध्या २६ टँकरने ४२ हजार नागरिक आणि २४ हजार ६५६ जनावरांना पाणी देण्यात येत आहे. खंडाळा तालुक्यातील दोन गावांत टंचाई आहे. त्यासाठी एक टँकर सुरू असून, १ हजार ३३० नागरिक आणि १५९ पशुधनाला आधार मिळाला आहे. वाई तालुक्यात ६ गावे आणि ५ वाड्यांना, तर पाटणमधील २ गावे तसेच ८ वाड्यांसाठी टँकर सुरू आहे. कऱ्हाड तालुक्यातही ७ गावांतील ५ हजार नागरिक आणि ३ हजार जनावरांना ४ टँकरने पाणीपुरवठा होत आहे.

२१३ गावे अन् ६९४ वाड्यांसाठी १९९ टँकरचा धुरळाजिल्ह्यात २०१८ प्रमाणचे टंचाईची स्थिती निर्माण झाली असून, सध्या २१३ गावे आणि ६९४ वाडीवस्त्यांत टंचाईची झळ पोहोचली आहे. एकूण ३ लाख २७ हजार ५५६ नागरिक आणि २ लाख १० हजार २०२ पशुधनाला १९९ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. माण तालुका ७५ टक्के टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यातच जिल्ह्यातील अनेक गावांतून टँकरला मागणी होत आहे. त्यामुळे लवकरच आणखी टंचाईग्रस्त गावांची आणि टँकरची संख्याही वाढणार आहे.

६१ विहिरी अन् ५० बोअरवेल अधिग्रहणजिल्ह्यात टंचाईच्या गावांत टँकरने पाणीपुरवठा होत आहे. त्याचबरोबर लोकांना जवळ पाणी उपलब्ध व्हावे म्हणून विहिरी आणि बोअरवेलचे अधिग्रहण करण्यात आले आहे. सध्या ६१ विहिरी आणि ५० बोअरवेलचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यातूनही लोकांना पाणीपुरवठा केला जात आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणीdroughtदुष्काळ