शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

Satara: कोयना नाही भरले; सिंचन, वीजनिर्मितीला फटका

By नितीन काळेल | Published: October 12, 2023 6:51 PM

६० वर्षांत ९ वेळा धरणात कमी पाणी

सातारा : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयनेत अवघा ९३ टीएमसी पाणीसाठा असल्याने सुमारे ६० वर्षांत धरण नवव्यांदा भरलेले नाही. त्यामुळे तरतुदीप्रमाणे सिंचन आणि वीज निर्मितीला पाणी कमी पडणार आहे. परिणामी या दोन्हींवरही परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.पाटण तालुक्यात कोयना नदीवर हे धरण बांधण्यात आलेले आहे. या धरणाला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजले जाते. तसेच राज्यातील मोठ्या धरणांपैकी हे एक आहे. या धरणाची पूर्वी पाणीसाठवण क्षमता ९८.८८ टीएमसी होती. त्यानंतर क्षमता वाढविण्यात आल्याने २००६ पासून धरणात १०५.२५ टीएमसी एवढा पाणीसाठा होऊ लागला आहे. या धरणक्षेत्रात दरवर्षी सरासरी पाच हजार मिलीमीटरवर पर्जन्यमान होते. त्यामुळे धरणात पाण्याची आवक होत असते. मात्र, यंदा पर्जन्यमान कमी झालेले आहे. याचा परिणाम धरणातील पाणीसाठ्यावर झालेला आहे. यंदा धरण भरलेच नाही. तर सध्या ९२.९१ टीएमसीच पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे सिंचन आणि वीजनिर्मितीवरही परिणाम होऊ शकतो.कोयना धरणात १०५.२५ टीएमसी पाणीसाठा होत आहे. त्यातील ६७.५ टीएमसी पाणी हे वीजनिर्मितीसाठी राखीव आहे. तर सिंचनासाठी ५५ टीएमसी पाण्याची तरतूद आहे. सिंचनासाठीचे पाणी पावसाळ्यातील विसर्ग धरून आहे. यंदा मात्र, धरणात अपुरा पाणीसाठा असल्याने सिंचन आणि वीजनिर्मितीवरही परिणाम होण्याची भीती आहे. यासाठी १५ ऑक्टोबर रोजी धरणातील पाणीसाठा विचारात घेऊन सिंचन आणि वीजनिर्मितीसाठी किती पाणी राहणार हे निश्चित होणार आहे. तर यापूर्वीही आठवेळा धरण भरले नव्हते. त्यातील २००, २००१ आणि २००३ या वर्षात धरणात कमी पाणीसाठा होता.कोयना धरण भरले नाही..वर्ष             पाणीसाठा१९६८             ९४.२०१९७२             ८९.६९१९८७             ९१.२३१९९५             ७६.२९२०००             ८७.१५२००१             ८८.२२२००३             ९३.५५२०१५             ७८.७४२०२३             ९२.९१

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKoyana Damकोयना धरणWaterपाणी