शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
3
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
4
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
5
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
6
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
7
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
8
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
9
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
10
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
11
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
12
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
13
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
14
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
15
भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
16
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
17
'अबीर गुलाल'नंतर नुकतीच सुरु झालेली कलर्स मराठीवरील नवी मालिका होणार बंद? चाहत्यांना धक्का
18
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
19
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
20
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश

Satara: उन्हामुळे धरणातील पाणीसाठा होऊ लागला कमी, सिंचनासाठी मागणी वाढली

By नितीन काळेल | Published: April 21, 2023 4:08 PM

पावसाळा सुरु होईपर्यंत कोयनेतील पाणीसाठा अत्यल्प राहण्याची भीती

सातारा : जिल्ह्यात गेल्यावर्षी चांगल्या पावसामुळे धरणे भरली. पण, आता उन्हाळा तीव्र होत चालला असून सिंचनालाही मागणी वाढली आहे. त्यामुळे धरणे वेगाने रिकामी होऊ लागलीत. सध्या प्रमुख सहा धरणांत ८८ टीएमसी पाणीसाठा असलातरी गतवर्षीपेक्षा कमी आहे. तसेच कोयना धरणातही मागीलवर्षीपेक्षा १९ टीएमसीने साठा घटला आहे. त्यामुळे पाऊस वेळेत सुरू झाल्यास अडचणी निर्माण होऊ शकतात.जिल्ह्यात मागील चार वर्षांपासून मान्सूनचा चांगला पाऊस होत आहे. यामुळे सर्व धरणे ओव्हर फूल्ल होतात. तसेच पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी अनेकवेळा धरणातून पाणी सोडावे लागते. परिणामी नदीकाठच्या गावांनाही धोका निर्माण होतो. गेल्यावर्षी तर नोव्हेंबर महिन्यापर्यंत पाऊस पडत होता. त्यामुळे रब्बी हंगामातील पेरणी पुढे गेली होती. त्यामुळे सुरुवातीच्या काळात सिंचनासाठी पाण्याची मागणी नव्हती. मात्र, गेल्या दीड महिन्यांपासून मागणीनुसार धरणांतून सिंचनासाठी विसर्ग करावा लागत आहे. आतातर पावसाळा तोंडावर आला आहे. दीड महिन्यानंतर मान्सूनचा पाऊस सुरू होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी सुरू केली आहे. पण, सध्या कडाक्याचे ऊन पडत आहे. त्यामुळे धरणांतील पाण्याचे बाष्पीभवन वाढले आहे. त्याचबरोबर सिंचनासाठीही पाण्याची मागणी वाढलीय. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वेगाने कमी होऊ लागला आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात प्रमुख सहा धरणे आहेत. या धरणांत गतवर्षीपेक्षा कमी पाणीसाठा राहिला आहे. तर महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयनेतील साठाही वेगाने कमी होऊन सध्या ४२.६८ टीएमसीच राहिला आहे. त्यामुळे पावसाळा सुरु होईपर्यंत कोयनेतील पाणीसाठा अत्यल्प राहण्याची भीती व्यक्त होत आहे.दरम्यान, जिल्ह्यातील धोम, कण्हेर, कोयना, बलकवडी, उरमोडी, तारळी या ६ प्रमुख धरणांची पाणीसाठवण क्षमता १४८.७४ टीएमसी इतका आहे. गेल्यावर्षी यावेळी या धरणांत ८८.२३ टीएमसी पाणीसाठा होता. तर यावर्षी तो ६४.१४ टीएमसी इतका आहे. तर १०५ टीएमसी क्षमता असणाऱ्या कोयना धरणात ४२.६८ टीएमसी साठा आहे. म्हणजेच या धरणात अजूनही जवळपास ४० टक्के पाणी आहे. त्याचबरोबर इतर धरणांमध्येही पाणीसाठा शिल्लक असलातरी मागीलवर्षीपेक्षा कमी आहे. त्यातच उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन वाढले आहे. सिंचनासाठी पाणी मागणीत वाढ असल्याने आगामी दीड महिन्यात धरणांतील पाणीसाठा वेगाने कमी होणार आहे.

कण्हेर, उरमोडीतून सिंचनासाठी विसर्ग...सिंचनाची मागणी वाढली आहे. त्यामुळे धरणांतून मागणीनुसार विसर्ग करण्यात येत आहे. सध्या कोयनेच्या पायथा वीजगृहातून २१०० क्यूसेक पाणी विसर्ग सुरू आहे. तर धोम धरणाच्या डाव्या कालव्यातून ५७८ क्यूसेक वेगाने सिंचनासाठी पाणी सोडले जात आहे. कण्हेरमधून २५० तर उरमोडी धरणातून डावा कालवा ४५० आणि नदीतून १०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सिंचनासाठी सुरू आहे.

जिल्ह्यातील प्रमुख धरणाचा साठा (टीएमसीमध्ये)धरणे -  यावर्षी - गतवर्षी - एकूण क्षमताधोम - ६.८६ - ८.३१ - १३.५०कण्हेर - ३.९३ - ४.९२ - १०.१०कोयना - ४२.६८ - ६१.७५ - १०५.२५बलकवडी - १.०३ - १.८७ - ४.०८उरमोडी - ५.३५ - ७.०१ - ९.९६तारळी - ४.११ - ४.३७ - ५.८५

टॅग्स :Satara areaसातारा परिसरDamधरणWaterपाणीKoyana Damकोयना धरण