कोरेगाव : कोरेगाव नगरपंचायतीने स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे हागणदारीमुक्त शहरांमध्ये कोरेगावचा समावेश झाला आहे. राज्यस्तरीय समितीने केलेल्या पाहणीमध्ये या शहराला चांगले गुण मिळाले आहेत. लोकप्रतिनिधी, मुख्याधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या सांघिक प्रयत्नामुळेच हे यश मिळवता आले आहे,’ अशी माहिती नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांनी दिली.
स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने नगरपंचायतीने अत्यंत शिस्तबद्ध काम केले आहे. प्रत्येक नागरिकाबरोबरच घराघरात स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात यश आले आहे. जनजागृती मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाल्याने हागणदारीमुक्त शहरांमध्ये कोरेगावचा समावेश होऊ शकला आहे. नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांच्यासह सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी पूनम कदम-शिंदे, कार्यालयीन अधीक्षक बाळासाहेब सावंत व कर्मचाºयांनी या मोहिमेत अहोरात्र मेहनत घेतली. प्रत्येक प्रभाग स्वच्छ राहील, याकडे कटाक्षाने लक्ष दिले गेले. शहरातील सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती करण्याबरोबरच दररोज साफसफाई केली जात असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यस्तरीय तपासणी समितीने कोरेगावची पाहणी केली होती. त्यामध्ये नगरपंचायतीने केलेल्या उठावदार कामगिरीची त्यांनी दखल घेतली आहे. नगरपंचायत विभागात कोरेगावला राज्यस्तरावर यश मिळाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. जिल्हा नियोजन समिती सदस्य संजय पिसाळ यांनी मनोगतामध्ये नगरपंचायतीने केलेल्या कामगिरीचा गुणगौरव केला. कार्यक्रमास उपनगराध्यक्ष जयवंत पवार, बाळासाहेब बाचल, बच्चूशेठ ओसवाल, नागेश कांबळे, राजेंद्र बर्गे, महेश बर्गे, सुनील बर्गे, राहुल बर्गे, किशोर बर्गे, कुमार बर्गे, गणेश येवले, अर्चना बर्गे, मंदा बर्गे, संगीता बर्गे, सुलोचना फडतरे, रेश्मा जाधव, रेश्मा कोकरे, पूनम मेरुकर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.अधिकारी, कर्मचाºयांचा सत्कारमुख्याधिकारी पूनम कदम-श्ािंदे व कर्मचाºयांचे प्रतिनिधी म्हणून कार्यालयीन अधीक्षक बाळासाहेब सावंत यांचा गुरुवारी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांनी सत्कार केला. भविष्यात देखील सर्वच पातळीवर कोरेगाव शहर उठावदार कामगिरी करेल आणि राज्यात नावलौकिक मिळवेल, असा विश्वास बर्गे यांनी व्यक्त केला.कोरेगावमध्ये गुरुवारी मुख्याधिकारी पूनम कदम-शिंदे यांचा नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, उपनगराध्यक्ष जयवंत पवार यांनी सत्कार केला.