लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोरोनाच्या काळात वयोवृद्धांचे मृत्यू होण्याचे प्रमाण एकीकडे अधिक असताना दुसरीकडे मात्र ० ते १४ वर्षे वयोगटातील मुलांचे मृत्यूचे प्रमाण जिल्ह्यात अत्यंत नगण्य आहे. याचे मुख्य कारण म्हणजे लहान मुलांच्या टी सेल (पेशी) सक्रिय झालेल्या नसतात. त्यामुळे नैसर्गिकरित्या मुलांचा कोरोनापासून बचाव झाला.
जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर लहान मुले गांगरुन गेली होती. वयोवृद्धांचे मृत्यूचे प्रमाण झपाट्याने वाढत असताना लहान मुलांच्या काळजीने पालक अस्वस्थ झाले होते. मात्र, जिल्ह्यात केवळ एका सहा वर्षाच्या बालिकेचा इतर आजार आणि कोरोनामुळे मृत्यू झाला. अन्यथा एकाही लहान मुलाचा मृत्यू झालेला नाही. भीतीपोटी लहान मुलांना घरातून बाहेर साडले जात नव्हते. शिवाय मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर याचेही मुलांनी काटेकोरपणे पालन केले. त्यामुळे मुलांपासून कोरोना कोसो दूर राहिला.
जिल्ह्यात ० ते १४ वर्षे वयोगटातील मुलांचे मृत्यू
९ १
२०१९- २०२०
चौकट : मुलांच्या मृत्यूचे कारण
कोरोना काळात केवळ एका बालिकेचा मृत्यू झाला. संबंधित बालिकेच्या डोक्यात ताप मुरला होता. त्यातच कोरोनाची लागण झाली. या दोन्ही आजारांमुळे मुलीचा मृत्यू झाला. तसेच गेल्यावर्षी ९ मुलांचा मृत्यू झाला. यामध्ये काही मुले काविळ, डीहायड्रेशन, अपघात अशा कारणांनी मृत्यूमुखी पडली होती.
चौकट : मास्कचा झाला चांगला उपयोग
कोरोनाच्या भीतीमुळे लहान मुलांना घराबाहेर सोडले जात नव्हते. घरात असतानाही मुलांना मास्क लावण्याची सक्ती करण्यात आली होती. त्यामुळे इन्फेक्शन झाले नाही. परिणामी मृत्यूचे प्रमाण घटले असल्याचे बालरोगतज्ज्ञांचे मत आहे.
चौकट : काय म्हणतात चिल्ड्रन स्पेशालिस्ट
लहान मुलांमध्ये थायमस नावाची गळ्याजवळ एक ग्लॅड असते. ती पूर्णपणे अॅक्टिवेट झालेली नसते. त्यामुळे लहान मुलांचे कोरोनापासून बरेचसे संरक्षण झाले. लहान मुलांच्यात काही टी सेल असतात. त्यासुद्धा सक्रिय झालेल्या नसतात. त्यामुळे नैसर्गिकरित्या मुलांना संरक्षण मिळाले.
डॉ. अरूंधती कदम
बालरोग तज्ज्ञ
प्रतिक्रिया :
लहान मुलांना बीसीजी आणि गोवर या लसीही दिलेल्या असतात. त्याही काही प्रमाणात लहान मुलांचे संरक्षण करतात. परिणामी कोविडचे इन्फेक्शन लहान मुलांना न झाल्याचे हे सुद्धा एक प्रमुख कारण आहे.
डॉ. ज्ञानेश्वर हिरास
फोटो : २२ मास्क