सातारा , दि. १६ : कास पुष्प पठारावरील फुलांचा हंगाम आता ओसरला असून सोमवार, दि. १६ आॅक्टोबरपासून शुल्क वसूली बंद होणार आहे, अशी माहिती कास पठार कार्यकारणी समितीचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आखाडे यांनी दिली.
फुलांचा हंगाम सुरू होताच देश विदेशातील पर्यटकांची पावले आपसूकच कास पठाराकडे वळत होती. गेल्या दीड महिन्यांपासून सुमारे ८० हजार पर्यटकांनी कास पठाराला भेट देऊन येथील फूलोत्सव तसेच निसर्गसौंदयार्चा मनमुराद आनंद लुटला.
सध्या फूलांचा हंगाम ओसरल्यामुळे कास पठाराकडे जाणाऱ्या पर्यटकांकडून आकारण्यात येणारे प्रवेश शुल्क सोमवार, दि. १६ पासून बंद करण्यात येत आहे.
दोन आॅक्टोबरला यवतेश्वर घाटातील रस्ता खचल्याने कास पठाराकडे जाणाऱ्या पर्यटकांना प्रवेश मनाई करण्यात आली होती. त्यामुळे हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात पर्यटकांना कास पठारावर जाता आले नाही.